मांदाटने ग्रुप ग्राम पंचायतच्या वतीने 14 व्या वित्त आयोगा मार्फ़त आदिवासी कुटुंबाना साहित्य वाटप !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
ग्रुप ग्राम पंचायत मांदाटने तालुका म्हसळा जिल्हा रायगड यांच्या वतीने 14 व्या वित्त आयोगा मधून आदिवासी कुटुंबाना साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी मांदाटने ग्रामपंच्यातचे सरपंच श्री.  चंद्रकांत लक्ष्मण पवार, उपसरपंच धनश्री मुंडे, सदस्य भिकू डोंगरे, शंकर गोरीवले, नीता पवार, शुभांगी शिगवण, मीनाक्षी मानवे, शेफाली लाड, प्रज्ञा दिवेकर, शांताराम खैरे आणि लाभार्थी परिवार व ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 ग्राम पंचायत मांदाटने च्या वतीने एक पाऊल स्वच्छते कड़े आणि तालुक्यात आदर्श ग्रामपंचायती चे उद्दिष्टे बाळगुण जनजागरण, कार्य हाती घेऊन अनेक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असून त्यासाठी ग्रामपंचयतीचे सर्व सदस्य, सरपंच, सर्व नागरिक ग्रामसेवक श्री पि.बी ठाकरे या साठी कार्य करत आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या