माणगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन…

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)

जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते माणगांव नगरपंच्यात हद्दीतील तीन रस्त्याचे डांबरीकरण, कचेरी रोड येथील नवीन पाईप लाईन, समतानगर येथील एक रस्ता डांबरीकरण बामनोली रोड कालवा रस्ता व गटार लाईन विश्रामग्रह ते कुंभारवाडा रस्ता डांबरीकरण, माणगांव प्रांत कार्यालयाजवळ व्हिकटोरीय क्रॉस वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन वीर पत्नीच्या हस्ते व ना.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना उपक्रमातर्गत माणगांव तालुक्याकरिता फिरता पशु वैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण पालकमंत्री च्या हस्ते करण्यात आला. यावेळी माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, नगराध्यक्षा योगिता चव्हाण उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे माणगांव तालुका पशुवैद्यकिय आधिकारी, नागरिक , कार्यकर्ते कोरोना प्रतिबंधक नियम पाळून उपस्थित होते.

ताज्या बातम्या