माणगाव तालुक्यातील दिशा प्रकल्प चा आगळा वेगळा उपक्रम मानले कोरोना योध्यांचे आभार !
( रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे )
माणगाव गेल्या 4 वर्षापासून एच.डी.एफ.सी परिवर्तन आणि दिशा मॅजिक बस यांच्या वतीने दिशा प्रकल्प महाराष्ट्रातील आठ जिल्हात काम करत असून त्या पैकी रायगड जिल्ह्यतील माणगाव तालुकयातील भाले व जावळी या गावातील मुलांच्या विकासा साठी दिशा प्रकल्प काम करत असून या मध्ये जीवन कौशल्य हे प्रामुख्याने शिकवले जात असे.
जगभरात कोरोना ची साथ असल्या ने संपूर्ण देशात भीतीचर वातावरण होते.पण आत्ता कोरोना लस मुळे दिलासा मिळाला असून याच अनुषन्गाने दिशा प्रकल्पच्या वतीने भाले या गावात “बालसंसद “च्या वतीने एक प्रकल्प राबवण्यात आला. या उपक्रमात बालमंत्री मंडळ याने सहभाग घेतला या उपक्रमाचा उपदेश असा होता कि देशातील सर्व कोरोना योद्धयांचे प्रतिनिधित्व करणाऱया गाव पातळीवर सर्व कोरोना योद्धयांचे आभार मांडले व त्यांना स्वहस्ते तयार केलेले शुभेच्छा पत्र देऊन गौरवकेला या मध्ये सरपंच,शिक्षक,आशाताई नर्स,कार्यक्रमात दिशा प्रकल्प चे समनव्यक श्री संभाजी शिंदे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिगारे सर व उपस्थित सहकारी शिक्षक,विदयाथीं समस्त ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते या कार्य कार्यकर्माचे प्रास्ताविक श्री.संभाजी शिंदे सर याने केले.
श्री.शिगारे सर यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार बालमंत्री मंथन शिंदे याने व्यक्त केले.