शिवसेना शिंदे गटाकडून देगलूर- बिलोली मतदार संघात मंगेश कदम यांचे नाव चर्चेत..

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली चे भूमिपुत्र मंगेश कदम यांचे दहावीपर्यंत शिक्षण बिलोलीत झाले व त्यांच्या कुटुंबीयांची गावातील सर्व जाती धर्मातील लोकांशी अत्यंत प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजपर्यंत बिलोलीशी आपली नाळ तुटू दिली नाही म्हणून सर्वजण त्यांना बिलोलीचे भूमिपुत्र म्हणतात.
त्यांचा मित्रपरिवार देगलूर, बिलोली तालुक्या सह जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात आहे.ते सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी बिलोली सारख्या ग्रामीण भागातून जाऊन नांदेड शहरातील तरोडा भागाचे नेतृत्व केले. दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य एक वेळा पंचायत समिती सदस्य तीन वेळा महानगरपालिका नगरसेवक पदाचा दांडगा अनुभव कदम यांना आहे.
मंगेश कदम यांच्यासारखा अनुभवी सर्व समाजाला घेऊन चालणारा व विकासाची दूरदृष्टी असणारे हे नेतृत्व नेहमी इतरांना मदत करण्याची त्यांची वृत्ती विविध समाज उपक्रम सतत राबवणारे एक नेतृत्व म्हणून मंगेश कदम यांनी सबंध जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जनतेने एक दोन वेळेस नाहीतर तब्बल सहा वेळेस जनतेने निवडून दिले व सध्या शिवसेना जिल्हाप्रमुख एससी एसटी ओबीसी विभाग शिंदे गटाची जिल्ह्याचे जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे ते सांभाळत आहेत कोरोना सारख्या महामारीच्या काळातही त्यांनी शासकीय मदतीची वाट न बघता महाराष्ट्रात सर्वात अगोदर आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी मोफत धान्य वाटप अनेक नगरामध्ये वस्त्यांमध्ये दररोज अन्नधान्य करणे लोकांनी कोरोनाच्या काळात काय करावे कसे राहावे यासाठी जनजागृती करणे अशा संकटाच्या परिस्थिती त जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना रक्तदान शिबिर घेऊन रक्ताच्या पिशव्या शासकीय रक्तपेढीला देऊन मानव जातीसाठी मदत म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
दरवर्षी अनाथ आश्रमात अन्नदान करणे,जीवन उपयोगी वस्तू वाटप करणे, हिवाळ्यात रस्त्यावरील गरीब व निराधार लोकांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून दरवर्षी ब्लॅंकेट चादर वाटप करणे, नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत रक्तदान शिबिर घेणे,अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविणे प्रभागात अनेक ठिकाणी स्वखर्चाने मोफत वाचन कट्टे दरवर्षी समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम राबविणे देगलूर व बिलोली मतदारसंघात मंगेश कदम प्रत्येक समाजामध्ये धर्मात त्यांचे संपर्क असून प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना मदत व देणगी देणे गोरगरीब रुग्णांना दवाखान्यासाठी मदत करणे, गोरगरिबांना शैक्षणिक मदत करणे.
असे अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असल्याने मंगेश कदम सारख्या नव्या चेहऱ्यास संधी मिळाल्यास संधी सोने होईल.सध्या होणाऱ्या देगलूर बिलोली मतदारसंघात विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश भाऊ कदम यांचे नाव चर्चेत आहे मंगेश भाऊ कदम यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिल्यास नक्कीच याचा फायदा देगलूर बिलोली मतदारसंघातील येणाऱ्या काळामध्ये होईल मंगेश भाऊ कदम यांचा देगलूर -बिलोली मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून सामाजिक कार्य करणाऱ्या या नेतृत्वाला पक्षाने संधी दिल्यास मतदारसंघातील विकासाचा कायापालट होऊ शकतो आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास मतदार संघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या वीस वर्षापासून देगलूर बिलोली मतदारसंघ हा राखीव असून मनावा तेवढा विकास झाला नाही.
राजकीय उदासीनतेमुळे व सक्षम नेतृत्व नसल्यामुळे विकास झाला नाही.जर देगलूर बिलोली मतदारसंघातून मंगेश भाऊ कदम यांना उमेदवारी दिल्यास या भागामध्ये जलसिंचनाची प्रश्न असतील रस्त्याचा प्रश्न उद्योगधंद्याचे प्रश्न,बेरोजगारी व रोजंदारीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून उमेदवार म्हणून मंगेश भाऊ कदम यांच्याकडे पाहिले जात आहे. शिंदे गटाने या मतदारसंघात दावेदारी केल्यामुळे मंगेश कदम यांनी शिवसेना पक्षाची मोठी ताकद या मतदार संघात निर्माण केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हा मतदासंघ आपल्याकडे ओढून घेतील व मंगेश कदम सारख्या होतकरू, विकासाची जाण असलेल्या नेतृत्वास संधी देतील असे या मतदासंघात बोलल्या जात आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या