उमरी येथे मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मंगेश कदम मित्र परिवाराच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे, पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सहसचिव तथा पत्रकार आनंद सूर्यवंशी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा पत्रकार गंगाधरराव सवई, कृषी अग्रो मित्र चे बालाजी देवके, राम वाघमारे,  अनिता वाघमारे,  भारतबाई सवई, लक्ष्मीबाई शेळके, सविताबाई गायकवाड, लक्ष्मीबाई पवार, सुमनबाई दांडेवाड, शांताबाई शेळके, चंद्राबाई मोरे, चंद्रकांत श्री कांबळे, दिलीप पोलशेटवार, राहुल वाघमारे, मोसिन उस्मान सय्यद, जळबा धनकवार, विनोद बनसोडे, विजय सवई, अविनाश बनसोडे, निळकंठ चौदंते, नागेश कांबळे आदींची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या