मंगेश कदम यांच्यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढेल – लक्ष्मणराव ठक्करवाड

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         मंगेश कदम यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे व त्यांचा दांडग्या जनसंपर्कमुळे बिलोली तालुक्यात महायुतीचे वर्चस्व राहील असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी शहरातील गांधीनगर येथील एकलव्य मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी महोत्सवात केले.
        बिलोली शहरात शिवसेनेचे शहर प्रमुख (शिंदे गट) श्रीकांत गादगे यांच्या एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने दही हंडीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना ठक्करवाड म्हणाले की सहा वेळेस लोकप्रतिनिधी असलेले मंगेश कदम यांच्या अनुभवाचा व दांडग्या जनसंपर्काचा चा महायुतीला फायदा होईल.
यावेळी व्यासपीठावर मंगेश कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, तालुका प्रमुख बाबाराव रोकडे,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,हर्ष कुंडलवाडीकर, शांततेश्वर पाटील,इंद्रजित तुडमे,राजू गादगे, महेंद्र गायकवाड, मुकिंदर कुडके, माजी नगरसेविका शशिकला खांडेकर, सौ. सविता राजेंद्र कांबळे, सौ.हेमा चौधरी, मुंगडे मॅडम यांची उपस्थिती होती.
बहुजन नेतृत्व मंगेश कदम यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत नुकताच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. बिलोली शहरात त्यांचा स्वागतार्थ महायुती व मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.मंगेश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी गजानन पांचाळ, दिलीप उत्तरवाड,अरविंद पवनकर,सुनील भास्करे,राहुल मामडे,शेख रसूल यांच्या सह महायुतीतील पदाधिकारी व मंगेश कदम मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
—————————————–
  • साठेनगर येथे मातंग समाजाने केले कदम यांचे भव्य स्वागत !!

——————————-====——–
शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे मुकिंदर कुडके मित्र मंडळाच्या वतीने बहुजन नेते मंगेश कदम यांचे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. तसेच धनगर समाज बांधव व बौद्ध समाज बांधवानी सुद्धा मंगेश कदम यांचे स्वागत केले यावेळी शिवकांत मैलारे, नबाजी वाघेकर, बाळासाहेब लाखे, रवी कांबळे, बंडू जाधव यांच्या सह बौद्ध, मातंग व धनगर समाजातील अनेकांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या