बहुचर्चित मंगरूळ खून प्रकरणातील महिलेस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – अँड विनोद धोत्रे यांचा युक्तिवाद 

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
नांदेड ता.हिमायतनगर तालुक्यातील मंगळूर येथे काही दिवसापुर्वी भांडण सोडविण्याच्या कारणावरून एकाचा खून झाला होता. या प्रकरणातील सह आरोपी असलेल्या एका महिला आरोपीस मा.औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. प्रस्तुत प्रकरणात हिमायतनगर तालुक्यामधील मौजे मंगरूळ गावात रात्री साडेनऊ वाजता भांडण सोडविण्याच्या कारणावरून एकाचा खून झाला होता.

त्यामुळे पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. आरोपीने माननीय भोकर न्यायालयात जामीन अर्ज केला होता परंतु तो माननीय न्यायालयाने अर्ज अमान्य केला. याच निर्णयाला आव्हान देत आरोपीने औरंगाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी एडवोकेट विनोद धोत्रे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
 त्यावर माननीय न्यायमूर्ती श्री एस जी मेहेरे यांनी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने काही अटी व शर्तीवर आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या