मांजरा नदी पाञात अवैधरित्य वाहनाद्वारे वाळुची तस्करी करताना ; वाळूचे दोन हायवा तहसिलदार श्रीकांत निळे यांच्या जाळ्यात !

[ बिलोली – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील येसगी मांजरा नदीपाञात दोन हायवा वाहनात लाल वाळू भरत असल्याचे बिलोली मा.तहसिलदार यांच्या कानी चाळ पडताच कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीकांत निळे यांनी येसगी नदी पाञात धाड टाकून वाहने ताब्यात घेऊन धडक.व धाडसी कार्यवाही करण्यासाठी वाहने ताब्यात घेतली आहेत.
तालुक्यातील पांढऱ्या पुढाऱ्यांच्या वरदहस्त बळावर मांजरा नदीपाञातून अहोराञ वाळू चोरट्यांनी अवैधरित्य हायवा, टाटा सुमो, अँटो व ट्रक वाहतूक करतांना शासनाच्या तिजोरीला चुन्ना लावत आहेत. अशी माहिती नांगरीकांकडून व वृत्तपञाच्या बातम्यांच्या माध्यमातून मिळाली.
त्यानंतर तहसिलदार निळे यांनी पथक नेमणूक केलेल्या पथकांना तहसीलदार मा.श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलावाड पोलिस व सहकार्याच्या मदतीने येसगी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या दोन हायवा त्याब्यात घेऊन शासन नियमानुसार दंडत्मक कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार बिलोली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात लावली. यावेळी नायब तहसीलदार निलावाड ,नायब तहसीलदार परळीकर तलाठी पवन ठकरोड, गायकवाड, बोंतावार आदी उपस्थित होते.
पंचनामा चा आहवाल मिळाला नाही, पंचनामाचा अहवाल आल्यानंतर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती आर.जे.चव्हाण यांच्याकडून मिळाली. तर दुसरीकडे तालुक्यातील वाळू चोरट्यांचे लक्ष तहसिलदार यांच्या कार्यवाहीकडे लागून आहे.
www.massmaharashtra.com
फोटोवर क्लिक करून YouTube Subscribe करा.

ताज्या बातम्या