मनोज पा.टाकळीकर हे दूरदृष्टीचे राजकीय निष्ठावंत कार्यकर्ते, भास्कराव पा.खतगावकर

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
   आपली पक्षावर निष्ठा ठेवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून कै.रावसाहेब पाटील टाकळीकर यांचा राजकीय व सामाजिक वारसा नेटाने पुढे नेणारे मनोज पाटील टाकळीकर हे दूरदृष्टीचे राजकीय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत असे प्रांजळ मत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.

मा. आ.वसंतराव चव्हाण यांनी मनोज पाटील टाकळीकर यांना शुभेच्छा देऊन म्हणाले की, सध्या जनता महागाईने त्रस्त असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती बदललेली आहे म्हणून काँग्रेस पक्षाला वातावरण पूरक असल्याने जनतेला अभिमान वाटेल असे कार्य मनोज पाटील टाकळीकर यांच्या हातून होण्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असे निष्ठावंत कार्यकर्ते महत्त्वाचे ठरतात.
  शहरातील जयराज पॅलेस येथे मनोज पाटील टाकळीकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित प्रसंगी विचार मंचावर अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तर मा.आ. वसंतराव चव्हाण,मा.आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष नागेलीकर, हनुमंतराव पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, श्रीनिवास पाटील चव्हाण, जिल्हा सचिव बालाजी मद्देवाड, तालुकाध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पा. भिलवंडे. उपनगराध्यक्ष विजय पा.चव्हाण, माजी सभापती सय्यद रहीम शेठ, प्राचार्य मनोहर पवार, राजु गंदिगुडे, पंकज पा. चव्हाण गटशिक्षणाधिकारी श्री कदम, श्री सद्गुरु आदिनाथ महाराज मठ संस्थान कोलंबी या उपस्थित मान्यवरांनी मनोज पाटील टाकळीकर यांना वाढदिवसाच्या औचित्याने पुष्पहार घालून त्यांचे अभिष्टचिंतन करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिले.
खतगावकर बोलताना पुढे म्हणाले,कै. रावसाहेब पाटील टाकळीकर यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यासाठी माझा सिंहाचा वाटा होता. कारण त्यांनी पक्षाशी व जनतेशी जिव्हाळ्याचे नाते तयार केले होते, त्यांचा वारसा नेटाने मनोज पाटील टाकळीकर हे पुढे नेत असताना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यास माझाही पाठिंबा राहील असेही ते म्हणाले. तर मा.आ.हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून मनोज पाटील टाकळीकर यांना भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हनुमंत भोपाळकर यांनी केले असून यावेळी चेअरमन शिवाजी तिजारे पाटोदा, रावण पाटील कहाळेकर, सरपंच कदम सोमठाणा, सरपंच नामदेव शिंदे मनुर, गुणाजी पाटील शिंदे, माजी सरपंच संभाजी शिंदे अंतरगाव, बाबुराव पाटील तोडे यासह बरबडा सर्कल मधील प्राध्यापक, शिक्षकवृंद, इंजिनिअर, डॉक्टर्स व विविध गावातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या