[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील गोदावरीच्या काठावर असलेल्या मनुर येथे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरातन कालीन हेमाडपंथी शिंगणापूर प्रतिरूप समजले जाणाऱ्या महादेव व बळीराजाच्या मंदिरात भाविकांनी शनी अमावस्येच्या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर गावकऱ्यांच्या वतीने पुरणपोळीचे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यातील मनुर येथील गोदाकाठावर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे, नवसाला पावणाऱ्या पुरातनकालीन शिंगणापूर प्रतिरूप समजले जाणारे हेमाडपंथी महादेव मंदिर व बळीराजाचे मंदिर एकत्र असल्याने या ठिकाणी विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी चार महिने चातुर्मास संपल्यानंतर प्रयाग आश्रमात प्रयागराजगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून माधव गिरी महाराजांच्या व औंढा नागनाथ येथील आनंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे निमित्ताने पुरणपोळीचा भंडारा आयोजित केला होता.

शनिवारी शनि अमावस्या आल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले म्हणून महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या मंदिरास तीर्थक्षेत्र घोषित करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाविक भक्त व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या