चिरली व दगडापूर गावात राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी ; मतदानावर पण बहिष्कार | मराठा आरक्षण वातावरण तापले

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
              बिलोली तालुक्यातील दगडापूर, चिरली- टाकळी गट ग्रामपंचायतच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्याचां व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठराव घेऊन घेण्यात आला.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षण २४ ऑक्टोबर पर्यंत न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणास बसले आसून त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून त्यांना पाठिंबा मिळत आहे याच अनुषंगाने बिलोली तालुक्यातील दगडापूर, चिरली- टाकळी थडी ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांनी एकमताने ठराव पास करत पुढाऱ्यांना गाव बंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला, तसेच गावात तसा फलक पण लावण्यात आला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या