राज्य आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी आता टोलवाटोलवी न करता अंतिम निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही छत्रपती संभाजीराजे यांनी फटकारले तर यावेळी प्रास्ताविक सादर करताना माधव देवसरकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असल्याचे सांगून हे आरक्षण न देण्यास कारणीभूत असलेल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे व लोकप्रतिनिधींचे राजेश मोरे यांनी आभार मानले खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील आमदार राम पाटील रातोळीकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ,बालाजीराव कल्याणकर, आ.मोहन अण्णा हंबर्डे, आ.शामसुंदरराव शिंदे, आ.भीमराव केराम, आ.तुषार राठोड व माजी आमदार जिल्हा नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष सर्व पक्षाचे जिल्हाप्रमुख सर्व सामाजिक संघटनेचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महाराष्ट्राचे नेते आणि हजारो समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाने जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
या सर्व आंदोलन स्थळा वरचे सूत्रसंचालन करणारे रवी सर ढगे यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy