घटनात्मक अधिकाराचा वापर करून शिक्षण व नोकऱ्यांतील आरक्षण पूर्ववत करण्यासाठी अध्यादेश काढा-सकल मराठा समाजाची मागणी

( लोहा प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे  )

नांदेड दिनांक 17/9/2020
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारने घटनात्मक अधिकाराचा वापर करून शिक्षण व नोकऱ्यांतील चालू असलेले SEBC आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी तात्काळ अध्यादेश काढावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सकल मराठा समाजाच्या वतीने संवैधानिक मागण्या दिसून आल्या. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करुन स्थगितीचा आदेश उठविण्यासाठी तातडीने पाऊले उचलावित.राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून शिक्षण व शासकीय सेवेत मध्ये लागू असलेले SEBC आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरीत आदेश काढावा.तसेच मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तो पर्यंत मराठा समाजाच्या वाट्याला येणाऱ्या शासकीय नोकर भरतीमधील सर्व जागा रिक्त याव्यात वा नोकर भरती स्थगित करण्यात यावी. शासनाने सकल मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेत त्वरीत आरक्षण द्यावे.अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना देण्यात आले.

ताज्या बातम्या