पक्ष बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी पळसगाव टाकळगाव एकजूट.

दि.२८ पासून साखळी उपोषण, सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात बंदी मतदानावर ही बहिष्कार…..
[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी :- गजानन चौधरी ]
 पळसगाव / टाकळगाव येथील सकल मराठा समाज बांधव हे अनेक पक्षांचे कार्यकर्ते पक्ष बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी एकत्रित आले असून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून दि.२८ आॅटोबर पासुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पळसगाव येथे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असून सर्व निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्धार गावातील सकल मराठा समाज बांधवांनी केला आहे.आरक्षणासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
     आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी गावोगावी उपोषण, पक्षाच्या पुढाऱ्यांना गाव बंदी, चक्काजाम, साखळी उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येत असून यामुळे गालबोट लागू नये म्हणून काळजी घेत शांततेत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे काहींना रोषाला सामोरे जावे लागत आहे.आरक्षणासाठीतालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
          पळसगाव / टाकळगाव गट ग्रामपंचायत येथील सकल मराठा समाज बांधव हे अनेक पक्षांचे कार्यकर्ते पक्ष बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी एकत्रित आले असून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारी गावत जाणा-या मुख्य रस्त्यावरील बसस्थानक येथे गावबंदीचा फलक लावण्यात आले असून सर्व निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्धार गावातील सकल मराठा समाज बांधवांनी केला आहे.दि.२८ आॅटोबर पासुन पळसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साकळी उपोषण सुरू केले जाणार आहे असे लेखी निवेदन नायगाव तहसील प्रशासनाला देण्यात आले. यावेळी पळसगाव /टाकळगाव येथील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या