नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मण बरगे, उपाध्यक्ष पदी रामप्रसाद चन्नावार. तर सरचिटणीस पदी रघुनाथ सोनकांबळे यांची निवड !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष गोवर्धनजी बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली नरसी येथील शिवकृपा मंगल कार्यालयात सोमवार दि.12‌‌ फेब्रुवारी रोजी पार पडली.
यावेळी पत्रकार संघटनेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण बरगे, उपाध्यक्षपदी रामप्रसाद चन्नावार, गोविंद नरसीकर, सरचिटणीसपदी रघूनाथ सोनकांबळे, कार्याध्यक्षपदी हनमंत वाडेकर, कोषाध्यक्षपदी साहेबराव धसाडे, सहसचिवपदी परमेश्वर जाधव, मुख्य संघटक पदी रामराव ढगे, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण मोरे, आनंदा सुर्यवंशी, सहदेव तुरटवाड, सल्लागार प्रा.डाॅ.निवॄती भागवत, प्रा.डाॅ.दयानंद माने, गंगाधर भिलवंडे, गजानन चौधरी, सय्यद जाफर, मनोहर तेलंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. 
       नायगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा दोन वर्षाचा कालावधी संपल्याने नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, सरचिटणीस राम तरटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगणवार, किरण कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत गवळे, सहाय्यक प्रल्हाद लोहेकर यांची उपस्थिती होती तर माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, जेष्ठ पत्रकार प्रा. डॉ. निवृती भागवत, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार माजी तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     निवडणूक प्रक्रिया राबवताना निवडणूक निर्णय अधिकारी असलेले प्रशांत गवळे यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी एकमेव लक्ष्मण बरगे यांचेच नाव आल्याने उपस्थित पत्रकारांनी एकमताने अनुमोदन दिल्याने निवड बिनविरोध करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे यांनी उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली. यात कार्याध्यक्ष : हनमंत वाडीकर, सरचिटणीस : रघुनाथ सोनकांबळे, उपाध्यक्ष : रामप्रसाद चन्नावार, उपाध्यक्ष : गोविंद नरसीकर, कोषाध्यक्ष : साहेबराव धसाडे, सहसचिव : परमेश्वर जाधव, मुख्य संघटक : रामराम ढगे, कार्यकारिणी सदस्य: रामकृष्ण मोरे, आनंदा सुर्यवंशी, सहदेव तुरटवाड. तर सल्लागार म्हणून प्रा. डॉ. निवृती भागवत, प्रा. डॉ. दयानंद माने, मनोहर तेलंग, गंगाधर भिलवंडे , सय्यद जाफर अदिंची निवड करण्यात आली. 
      अध्यक्षसह सर्वच पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष गोवर्धनजी बियाणी यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर बिनविरोध निवडीमुळे पत्रकार संघ एकजूट राहण्यास मदत होते असे यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार, जिल्हा संघटक पंडित वाघमारे. मावळते अध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस दिलीप वाघमारे, भुषण पाराळकर. कैलास तेलंग. सय्यद अजीम. बालाजी हणमंते, अनिल कांबळे, अंकूश देगावकर. माधव चव्हाण दिलीप नकाते. यशवंत मोरे, शेषराव कंधारे. अनिल कांबळे. धम्मदीप भद्रे. ज्ञानेश्वर तोडे. किरण शिंदे. शेषराव बेलकर प्रकाश महिपाळे. आनंदा डाकोरे. किरण वाघमारे. देविदास सूर्यवंशी. गंगाधर गंगासागरे, मारोती बारदेवाड. भास्कर भेदेकर.दिपक गजभारे. मिलिंद बचाव. आनंदा वाघमारे हुस्सेकर. मारुती बुके. गणेश कंदूरके.यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार मनोहर मोरे यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या