नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न !

[ नरसीफाटा वार्ताहर – गणेश पाटील कंदुरके ]
  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसी सलग्न असणाऱ्या नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी नांदेडच्या नायगांव तालुक्यातील नरसीच्या मुख्य चौकामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाले .

  या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकारांचे माजी जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे श्रावण भिलवंडे, काँग्रेसचे संभाजी भिलवंडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भिलवंडे , शिवसेनेचे रवींद्र भिलवंडे , ए .पी .आय. संकेत दिघे , पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल , मोहन पाटील भिलवंडे , डॉ. संतोष मोरे , डॉ. ज्ञानेश्वर जाधव यांसह ज्येष्ठ पत्रकार मनोहर तेलंग , प्रभाकर लखपत्रेवार , सरचिटणीस दिलीप वाघमारे , तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे , सरचिटणीस दिलीप वाघमारे , गोविंद नरसीकर , लक्ष्मण बरगे , शेषराव कंधारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती . 

    याप्रसंगी आपले मत व्यक्त करीत असताना सर्व मान्यवर म्हणाले की येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्या देत आसतांना सर्व स्थरातील लोकांना न्याय मिळाला पाहीजे अस व्यासपीठ हे कार्यालय ठरलं पाहीजे त्या अनुषंगाने बातम्या प्रकाशित करण्यासाठी येथील पत्रकारांनी आपले निपक्षपाती योगदान द्यावे जेणेकरून सामाजिक , राजकीय , धार्मिक चालू घडामोडी विषयी सर्व जनतेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती वाचायला मिळेल याची दक्षता घ्यावी . यावर अध्यक्षीय समारोप करीत असताना ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांनी पत्रकार हा सर्वांनाच न्याय देण्याची भुमिका पत्रकारितेच्या माध्यमातून साकारतो . तालुक्यातील सर्व जाणकार पत्रकार आहेत. हे निश्चितच आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे कार्य निर्भिडपणे करतील अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला .

    यावेळी पत्रकार मनोहर मोरे , आनंदा सुर्यवंशी , देविदास सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी, वीरेंद्र डोंगरे, गणेश कंदुरके , शाम चोंडे , माधव कंधारे यांसह सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती. कार्यक्रमाचं प्रास्तावीक गंगाधर गंगासागरे यांनी केलं तर सुत्रसंचलन पंडीत वाघमारे यांनी केलं शेवटी आभार प्रदर्शन नरसी शाखाध्यक्ष गोविंद टोकलवाड यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या