मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता कार्यक्रम !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा – 14 जानेवारी 22 ते 28 जानेवारी 2022 तहसील कार्यालय , शिक्षण विभाग म्हसळा व सार्वजनिक वाचनालय म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित मा.तहसीलदार घारे साहेब, पोलीस निरीक्षक सुर्वे साहेब सभापती मा.म्हात्रे मॅडम प्रा.टेकाळे सर श्री किशोर मोहिते, श्री तांबे सर उपस्थित होते सदर कार्यक्रम . तहसील कार्यालय ते सार्वजनिक वाचनालय येथे पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली.या वेळी कॉलेज, शाळेचे विद्यार्थी शिक्षक नागरिक दिंडी मध्ये सहभागी होवून मराठी भाषाविषयक घोषणा देण्यात आल्या.

सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे मराठी कविता वाचन गायन आणि मराठी भाषा मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी सर्वांचा आकर्षण ठरला तो बालकवी सयद याच्या “सांग विठू राया ” या कवितेने. वेध घेतला तसेच सभापती मा.म्हात्रे मॅडम यांनी ही सुंदर अशी कविता सादर करुन वातावरण मंत्रमुग़ध केले व मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा संवर्धना संदर्भात वसंतराव नाईक कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक श्री. टेकळे सर यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री समीर घारे साहेब तहसीलदार म्हसळा हे होते. आभारप्रदर्शन सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री. खांबेटे साहेब यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.रमेश जाधव प्राथमिक शिक्षक निगडी यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या