कुंडलवाडीत मराठी भाषा गौरव दिन साजरा 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
    येथील के रामलू नाबाद नगराध्यक्ष या सामाजिक ग्रुपच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त के रामलू मंगल कार्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मराठी भाषे विषयी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, कल्याण गायकवाड, सारिका सब्बनवार, अमरनाथ कांबळे, माधव हळदेकर, डॉ नरेश बोधनकर, राजेश कागळे, दत्तू हामंद आदींनी मनोगतातून माहिती दिली आहे.          
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सारिका सब्बनवार, माधव हळदेकर, कल्याण गायकवाड, संतोष शिवशेट्टे,शंकर कोणेरवार , गंगाधर शिंदे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साय्याराम मुक्केरवार,डॉ नरेश बोधनकर, अनिल पेंटावार, साईनाथ भोकरे, प्रशांत पांडे,दत्तू हमंद,आदींनी परिश्रम घेतले आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या