मराठी पत्रकार संघाची नायगांव तालुका कार्यकारिणी जाहीर ; कार्याध्यक्षपदी प्रकाश हनमंते तर सरचिटणीसपदी दिलीप वाघमारे !

[ विशेष प्रतिनिधी – बालाजी हनमंते कुंटुरकर ]
नायगांव (खै.) तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी प्रकाशभाऊ हनमंते तर, सरचिटणीसपदी दिलीप वाघमारे यांची आज सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नायगांव (खै.) तालुका मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत आज हि कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे, स.जाफर,प्रा.निवृत्ती भागवत, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, पंडित वाघमारे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या सभासदांची भास्कर पाटील भिलवंडे यांच्या फार्महाऊस नरसी येथे दि.२४ ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी प्रास्ताविकात आपली भूमिका विषद करतांना पत्रकारांच्या अडी,अडचणी समजून घेऊन त्यांना सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर, संघटना वाढीसाठी व आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासित कर्तव्यतत्पर राहू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बोलतांना प्रा.भागवत यांनी पत्रकारिता क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना सामोरे जात तालुक्यातील पत्रकारांनी गोरगरीब,वंचित व अन्यायग्रस्त लोकांना आपल्या लेखणीतून न्याय द्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलतांना जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मण भवरे यांनी संकटकाळात पत्रकारांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने राबविण्यात येत असलेल्या ‘ आम्ही आमच्यासाठी ‘ या दिशादर्शक उपक्रमाची नोंद देशभरातील पत्रकारांचे लढवय्ये नेतृत्व तथा,मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी घेतली असून राज्यभरात हा आदर्श उपक्रम अनुकरणीय असल्याचे स्पष्ट केले आहे हि बाब आपणांसाठी भूषणावह असून आगामी काळात आपली जबाबदारी वाढली आहे त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्याचबरोबर, संघटनावाढीसह सामाजिक बांधिलकी जोपासून पत्रकारिता करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
दरम्यान गत बैठकीत नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी गजानन चौधरी यांची निवड करण्यात आली होती.आज त्यांनी सर्वसंमतीने उर्वरित तालुका कार्यकारिणी जाहीर केली.त्यामध्ये तालुका कार्याध्यक्षपदी प्रकाशभाऊ हानमंते,सरचिटणीसपदी दिलीप वाघमारे,उपाध्यक्षपदी मनोहर मोरे,रामराव पाटील ढगे,गंगाधर गंगासागरे,सहसचिवपदी रामप्रसाद चन्नावार तर,तालुका कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण बरगे,बालाजी हानमंते, मारोती बारदेवाड,अशोक जाधव,प्रशांत वाघमारे,भगवान शेवाळे,किरण वाघमारे,साहेबराव धसाडे यांची निवड करण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे गत अनेक वर्षांपासून संघटनेत निष्ठेने कार्यरत असलेल्या तसेच, सामाजिक भावनेतून काम करित असलेल्या पत्रकारांना सामावून घेत सर्वसमावेशक असलेल्या या कार्यकारिणीच्या निवडीनंतर उपस्थित पत्रकारांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी कैलास तेलंग,गोविंद नरसीकर,शेषेराव कंधारे, दत्तात्रय संगेवार,अनिल कांबळे,प्रकाश महिपाळे, बालासाहेब शर्मा, धनंजय देशमुख,शामसुंदर गायकवाड,शेख अजिम, राघोबा वाघमारे,दिगांबर झुंबाडे,विठ्ठल गोडगेवाड,शेषेराव बेलकर, अब्दुल करिम,निळकंठ जाधव, धम्मानंद भेदेकर,गंगाधर कांबळे, मारोती सुर्यवंशी आदींसह तालुक्यातील तब्बल ५३ पत्रकार उपस्थित होते.
नवनियुक्त सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे यांनी त्यांच्या वतिने सत्कार केला.
आम्ही आमच्यासाठी संकल्प पुर्णत्वास नेऊ – सोनखेडकर.
संकटकाळात तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी आम्ही आमच्यासाठी हा दिशादर्शक स्तुत्य उपक्रमाला सर्वांचीच समर्थ साथ लाभत असून सभासद,सदस्यांनी तातडीने रु.१००० जमा करावेत तसेच,सर्वांचा विमा काढण्यात येत असल्याने त्यासाठीच्या कागदपत्रांची लवकरात-लवकर पुर्तता करुन द्यावी आपणा सर्वांच्या सहकार्यातून हा संकल्प निश्चितच पुर्णत्वास नेऊ असा आत्मविश्वास याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या