मराठी साहित्य मंडळाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी डॉ.घ.ना.पांचाळ यांची निवड !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
आखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी लोहा येथील एक उत्तम लेखक, कवी, साहित्यिक डॉ.घ.ना.पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड आत्तापर्यंत डाॅ.पांचाळ यांनी साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने निवड समितीने केली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या शिफारशीनुसार आणि आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष पदी पांच वर्षाकरिता (म्हणजेच आजपासून ते दि.३१ डिसेंबर २०२७ पर्यंत) नियुक्ती केली आहे.
संस्थेच्या नियमानुसार आणि ध्येय धोरणानुसार आपण कार्यरत रहाल.मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तन-मन-धन ओतून कार्य करावे आपल्या हातून असेच उत्तरोत्तर कार्य घडो अशा सदिच्छाही संस्थेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या वेळी जेष्ठ साहित्यिक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर,राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे,राष्ट्रीय सरचिटणीस जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवडीबद्दल डॉ.घ.ना.पांचाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या