JJNS creation प्रस्तुत मराठी लघुपट “संवर्धन” आपल्या भेटीला !
(नायगांव प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर)
नायगाव (28 फेब्रुवारी)-
“संवर्धन” या लघुपटाची निर्मिती साई किरण ऍग्रो पोल्ट्री फार्म चे मालक श्री.अनंत माळगांवकर यांनी केली आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद शांताराम मेस्त्री यांनी केले आहे.
लघुपटाचे कलादिग्दर्शन गौरव शशिकांत साटम आणि आदित्य सहदेव धोपट यांनी केलं आहे. छायाचित्रण चैतन्य होले यांनी केले आहे. याचे संकलन रितेश परब यांनी केले आहे. रंगभूषा आणि वेशभूषा तेजस्वी रामचंद्र निगवेकर आणि अमृता पांडुरंग कोकणे यांनी केले आहे. याचे प्रोड्युकॅशन प्रतिक ठोंबरे आणि किरण घरत यांनी सांभाळले आहे. यातील कलाकार जीवन चव्हाण, किरण घरत, तेजस्वी निगवेकर, शुभांगी देठे, अमृता कोकणे, अभिषेक कुलकर्णी, गौरव साटम, आकांशा रोडे, विजय कोयंडे, अमोल पवार , महेश आंबेरकर , प्रतिक ठोंबरे, आदित्य धोपट , राहुल कांबळे इत्यादी. बालकलाकार आस्मि गायकवाड आणि अर्पित अहिरे इत्यादी. संवर्धन ‘ हा मराठी लघुपट गडकिल्ल्यांच्या संवर्धन केले पाहिजे यावर आधारित आहे.
या लघुपटामधून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. पण जो शिवाजी महाराजांच्या जयंती साठी गोळा केलेला निधी गडकिल्ल्याच्या डागडुजी करण्यासाठी, साफसफाई आणि सुशोभीकरण करण्यासाठी करा. असा संदेश दिला आहे. यातील सर्व कलाकारांनी खूप आत्मिकतेने काम केलं आहे. तसेच लेखकाने अनेक विषयांवर बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
गडकिल्ल्यावर जाऊन दारूच्या पार्ट्या करणे, प्रेमीकानी चित्र विचित्र काढलेली चित्रे आणि तोफा तसेच तेथील वस्तूवर पाय ठेऊन फोटो काढणे छायाचित्रे काढणे यावर बंदी घालावी.
अस भाष्य या लघुपटाच्या माध्यमातून केलं आहे. J J N S creation आम्ही सर्व शिवप्रेमी ना आव्हान करू इच्छितो की गडकिल्ले संवर्धन केलं पाहिजे. साफसफाई आणि सुशोभीकरण करण्यासाठी हातभार लावूयात. गडकिल्ले ही आपली संस्कृती आहे. ती जपली आहे. त्या गडकिल्ल्यासाठी आपल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे. एकत्र येऊन काम करूयात.
JJNS creation या आमच्या youtube चॅनेल वर जाऊन हा लघुपट पहा आवडला तर नक्की अभिप्राय कळवा. लवकरच आम्ही एक गडकिल्ला साफसफाई करणार आहोत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.