रझाकारांना कडवी झुंझ देणारे स्वातंत्र्य सैनिक कै.नरवीर माधवराव नळगे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष..

लोहा शहर प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे 

नांदेड
  लोहा शहरात रझाकारांनी तांडाव माजवला होता .लुटमार व आत्याचार करणे चालु होते. 20 जुलै रोजी रझाकारांनी लोहा लुटण्याचे ठरवले होते ही बातमी गावातील सर्वानाच कळाली त्यामुळे गावातील सर्व लोकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती व गावातील सर्व माणसे जंगलात जाऊन लपले होते.त्याच दिवशी 30ते 40 रझाकार हे सायंकाळी लोह्यात घुसले लोह्यातील गाढीला रझाकारांनी चारीबाजुला घेरले प्रचंड गोळीबार केला .या गाढीमध्ये चिमनराव मक्तेदार,पंडित पटवारी,बाळासाहेब पटवारी हे तिन कुंटुब राहत होते.यातील चिमणराव हे गरिब होते त्यामुळे रझाकारांनी त्यांना खांब्याला बांधले व या दोघांच्या संपत्ती कुठे आहे हे विचारुन घेतले व तलवारीने कापुन टाकले.संपुर्ण गढी लुटल्या नंतर पंडितराव व बाळासाहेब पटवारी यांना गोळ्या घालुन मारुन टाकले.त्यानंतर शहरातील दहा बारा घरे लुटली.परत जाताना त्यांची नजर माधवराव नळगे यांच्या वाड्याकडे गेली परंतु माधवराव नळगे हे मोठे सावकार असल्याने ते घरात हत्यारे तयार ठेवुनच बसले होते.यावेळी माधवराव नळगेनी रझाकारांनसोबत चकमक झाली माधवराव यांच्या बंदुकीने दोन तीन रझाकार मारल्या गेले .त्यामुळे रजाकार चिडले आणि माधवराव नळगे यांचे कठ्ठर दुश्मन झाले .
कंधार लोहा तालुक्यात रझाकारांनी हाहाकार माजवला होता हिंदू महीलांची अब्रु लुटल्या जात होत्या अनेकांना ठार मारले जात होते ‘जान बचाना है तो रझाकार बन’ म्हणून अत्याचार केले जात होते .रझाकाराचे मोर्चे काढून निषेध करनारे पडद्याआड होते .प्रत्यक्षात रझाकारासोबत लढा देणारे बोटावर मोजन्या इतकेच लोक होते. नरवीर माधवराव नळगे व त्यांच्या साथीदारांनी आपल्या जिवाची व कुटूंबाची पर्वा न करता रझाकाराचा मुकाबला केला. भारतीय सैन्याच्या मदतीने अनेक रझाकारांना मारले. या स्वातंत्र्य सैनिकांचा खरा इतिहास, पराक्रम, म्हणावा तेवढा समोर आला नाही. हे खेदाची बाबच म्हणावी लागेल.

17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणुन संबंध मराठवाडाभर साजरा केला जातो. व हुतात्म्यांना अभिवादन केल्या जाते. नांदेड जिल्ह्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत. यामध्ये काही बोगसही आहेत,यात शंका नाही.परंतु माधवराव नळगे सारख्या खऱ्या स्वातंत्र्य सैनीकाचा इतिहास लपवल्या जात आहे. नरविर माधवराव नळगे यांचा रझाकारांच्या काळातला इतिहास पाहिला तर खुप शुरविर व पराक्रमी आहे. 1948 साली निझामांनी कंधार लोहा तालुक्यात जुल्मी कहर माजविला होता. कासिम रझवीची धर्मांध संघटना आणि त्यात रजाकारांनी ताळतंत्र सोडुन हिंदु जनतेस त्रस्त करण्याचा सपाटा चालवीला होता. सरकारने प्रथमच सर्व हिंदुची शस्त्रे हिरावुन घेतली त्यामुळे हा काळ अस्ताचा ठरला. कंधारच्या त्या अंधकारमय वातावरणातुन महान कार्य ,धैर्य,व पराक्रम दाखवुन ,अत्यंत प्रतिकुल काळातही हिंमतीने टक्कर देवुन रझाकारांना माधवराव नळगे यांनी धुळ चारली. लोहा कंधार परीसरात रझाकारांची प्रचंड दहशत असतानाही कंधार शहरातील अनेक हिंदु महिलांना विर माधवराव नळगे यांनी रझाकाराच्या तावडीतुन सुटका केली.त्यामुळे माधवराव नळगे हे रझाकाराचे कट्टर दुश्मन झाले.त्यांना ठार मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जावु लागले रझाकारांनी एके दिवशी लोहा शहर लुटण्याचे ठरवले होते ही बातमी माधवराव नळगे यांना कळताच त्यांनी त्यांचे चुलते लक्ष्मणराव नळगे,माधवरावची पत्नी सौ.पार्वती नळगे हे सर्व लोहा येथील घरीच थांबले होते .त्याच रात्री त्यांच्या घराला रझाकारांनी चहुबाजूंनी वेढा देऊन लढाईला आव्हान दिले.माधवराव नळगे यांनी रझाकाराचा जमाव व शस्त्रसाठा पाहुन दरवाजा आतुन लावुन घेतला नळगे यांनी अगोदरच घरात दारूगोळा ,बंदुक ,तलवारी अशा शस्त्रसाठा घरातच पूरुन ठेवला होता.माधवराव नळगे व लक्ष्मण नळगे हे गच्चीवरूनच रझाकारांना झूंज देत होते यात तिन ते चार रझाकार गंभिर जखमी झाले त्यामुळे त्यांनी तुफान गोळीबार केला या गोळीबारामध्ये लक्ष्मण नळगे यांना गोळी लागली व ते शहीद झाले
माधवराव नळगे यांनी गोळीबार थांबवुन आपली पत्नी सौ.पार्वती नळगे यांना सुचना केली, की “तु,आपला वारस शिवाजी(मुलगा)घेवुन मागच्या परीसरातुन निघुन जा मि वाचुन जगुन आलो तर उद्या भेटु”परंतु सौ.पार्वती नळगे याही खुप हिम्मतवान होत्या.त्यावेळी पाच महिन्याच्या गरोदर असुनही डगमगल्या नाहीत .जगलात तर सगळेच जगु मेलात तर.सगळेच मरु’असे वाक्य ऐकल्यानंतर माधवराव नळगे यांनी माडीवरुन मागील दोर सोडला व त्याद्वारे पत्नी सौ.पार्वती नळगे व मुलगा शिवाजी नळगे यांना खाली उतरुन मागच्या वाटेने देशमुख धानोराकडे निघाले माधवराव नळगे हे घरातच आहेत असे समजुन रझाकारांना वाटले व त्यांनी घराला आग लावुन टाकली रात्रीच्या वेळेस कडेकोट अंधारात माधवराव नळगे आपल्या परीवाराला धानोरा या गावी गेले. शिवाजी नळगे हे त्या वेळी 3 वर्षाचे असतील त्यात ते भुकेने व्याकुळ झाले होते.अशा वेळेस एका बाईने त्यांना शिळी भाकर दिली.त्या वेळी या मातेच्या डोळ्यात पाणी आले. आज विर माधवराव नळगे पुत्र शिवाजी नळगे यांनी आपल्या बालपणात रझाकारांचा अत्याचार व आपल्या वडिलांनी रझाकारांना शिवाजी नळगे यांनी त्यावेळी बालपणात पाहिले आहे. माधवराव नळगे हे आपल्या परिवारासोबत देशमुख धानोरा येथे पोहचले त्या ठिकाणी 3 दिवस त्यांनी आराम केला . माधवराव नळगे हे धानोरा येथे आहेत हे कळले रझाकार धानोरा येथे गेले गाववाल्यांना ‘ नलगे को हमारे हवाले करो वरना तुम्हारी कुछ खैर नही ‘ अशी धमकी दिली, त्यावेळी मात्र गावातील लोकांनी ईमान राखले ‘ माधवराव नळगे यहाँ पर नही है,आयेंगे जब तुम्हे खबर देंगे.’असे सांगुन रझाकारांना पाठवुन दिले. माधवराव नळगे यांना वाटले की आपल्यामुळे येथील लोकांना त्रास नको म्हणून जाण्याचा निर्णय घेतला रझाकार नळगे यांच्यावर खुप नजर ठेवुन होते त्यामुळे त्यांना धानोऱ्यातुन निघता येईना त्यावर त्यांनी युक्ती करुन आपल्या पिळदार व रुबाबी मिशा काढुन टाकल्या ,अंगात भगवे कपडे घालून साधु म्हणुन पंढरपूरच्या रस्त्याने निघाले. रझाकारांना ओळखु येऊ नये म्हणून ते समोर जात व त्यांची पत्नी व मुलगा त्यांच्या मागे मागे जात होते.कसे बसे त्यांनी पंढरपुर गाठले काही दिवस ते साधुच्या वेशात ते पंढरपूरात राहिले माधवराव नळगे हे पंढरपुरातच आहेत हि वार्ता रझाकारांना कळताच 3 रझाकार साधुच्या वेशात पंढरपुरला गेलेतेथील काही साधुंना ” माधवराव नळगे यांचे आम्ही गुरु आहोत “अशी युक्ती रझाकारांनी लढवली त्यावेळी एका साधुने तुम्हाला तुमचे गुरु भेटण्यासाठी आले असे सांगीतले.आपल्याला भेटायला आलेले हे रझाकारच आहेत असे लक्षात आले. तेव्हा माधवराव नळगे यांचे सासरे केरबा वस्ताद शिंदे यांनी त्याच ठिकाणी रझाकारांना मारुन चंद्रभागेत टाकले .पंढरपूरहुन पुण्याला गेले व मिल्ट्री अधिकार्यांना भेटले त्यावेळी त्यांनी ‘
निझाम आम्हाला शरण आलेत तुम्हाला मिल्ट्री देऊ शकत नाही’ असे मिल्ट्री आधिकाऱ्यांनी सांगीतल्या नंतर माधवराव नळगे हे नाना पाटील ( पत्रे सरकार ) यांना भेटले व त्यांना घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतली . सर्व प्रकार त्यानी सांगीतला . त्यावर सरदार पटेलांनी भारतीय सैन्य देऊन नांदेडकडे रवाना केले हि वार्ता रझाकारांना कळाली . सैन्याला कंधार व लोह्यात येता येऊ नये यासाठी रस्त्या्रील पुल पाढण्यास रझाकारांनी सुरुवात केली. भारतीय सैन्य गुरुवारी नांदेडात दाखल झाले.तेव्हाच जिल्ह्यातील रझाकारांची धडपड चालु झाली. माधवराव नळगे हे कंधारला आले तेव्हा कंधार येथील रझाकारांनी शुक्रवारी नमाज झाल्यानंतर कंधारमधील सर्व हिंदुना कापुन टाकण्याचा निर्णय घेतला. हि खबर माधवराव नळगे यांना समजली त्याचवेळी ते व अनंतराव मामडे हे दोघे नांदेडला रवाना झाले. त्यांनी सर्व प्रकार सैन्याच्या आधिकारी यांना सांगीतला. सैन्यांनी लगेच नमाजच्या अगोदर पोहचता यावे या बेताने ते सुमारे 16 मिल्ट्री गाड्या हत्यारासहित भरुन दोन रनगाडे घेऊन ती मिरवणूक कंधारकडे निघाली हे सैन्य कंधारला पोहचले. विजयगड येथे रनगाडे नेण्यात आले . हि बातमी रझाकारांना कळाली. त्यामुळे रझाकारांची धावपळ सुरु झाली.पानभोसी रोडवर शेरखान नावाच्या व्यक्तिच्या घरात रझाकार लपुन असल्याची माहीती मिळाली . त्या दिशेने विजयगड वरुन तोफ उडवुन रझाकार मारण्यात आले . तळ्याच्या परीसरातही रझाकार असल्याचे समजताच माधवराव नळगे यांच्या सांगण्यावरुन जलतुंग तलावात विजयगड येथुनच तोफगोळा सोडला. त्यानंतर सर्व.मिल्ट्री व रनगाडे गावात आणले . रझाकारांना विजयगड व माणिकगड येथे रांगेत थांबवुन गोळ्या घालुन ठार केले . काही रझाकारांची मुंडके विजयगड येथे पडुनच होते. हे पाहण्यासाठी अनेक लोक त्यावेळी विजयगड येथे येत जात असे .सुज्ञ लोक व वयस्कर लोक सांगतातअनेक रझाकार पळुन गेले .काही रझाकारांना पकडुन ठार केले त्यावेळी माधवराव नळगे यांनी धाडस दाखवले नसते तर रझाकारांनी अनेक हिंदुना मारले आसते.माधवराव नळगे हे स्वःता रझाकारांनसोबात लढले आणि विजय मिळवला हा यांचा एवढा मोठा इतिहास असतानाही त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानित केले नसल्याने त्यांच्या कुटुंबाना या बाबतिचे खेद वाटत असेल .

ताज्या बातम्या