के.रामलू शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
       येथील के.रामलू शाळेत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवा निमित्त स्वच्छता अभियान व अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम नाटिकेसह वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

यात 16 सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर 17 सप्टेंबर सकाळी ठीक ७:४५ वाजता ध्वजारोहणानंतर वक्तृत्व स्पर्धेस सुरुवात झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलवाडी नगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख ओंमकार शहाणे आणि साने गुरुजी शाळेचे शिक्षक सुरेश सोनकांबळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.

तर पालक प्रतिनिधी म्हणून कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शेख शाहीन नबी व पाटील मॅडम तसेच कुंडलवाडी मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान व अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटके सादर करण्यात आली आणि घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये युकेजी मधून सौम्या कामठाने प्रथम तर समर्थ गट्टूवार द्वितीय पहिली ते चौथी गटातून स्नेहल सुरेश सोनकांबळे प्रथम तर मारिया बेग, श्रेया धात्रक द्वितीय आणि पाशावार अभिजीत पेंडकर श्रेजल तृतीय तर उत्तेजनार्थ म्हणून आलीना सय्यद पाचवी ते सहावी या गटातून श्रेया कामठाने प्रथम अनुष्का कोंडावार द्वितीय श्रेया गट्टूवार तृतीय आणि उत्तेजनार्थ म्हणून प्रतीक्षा क्यादरवार व श्रेया पवार सातवी ते दहावी गटातून प्रथम समीक्षा जाधव द्वितीय ईश्वरी लाकडे, तृतीय श्रुती हाके तर उत्तेजनार्थ म्हणून अक्षरा मॅकलवार आणि तसेच निबंध स्पर्धेत चौथी ते सहावी गटातून सिद्धांत नागठाणे प्रथम ,श्रेया गट्टूवार द्वितीय, श्रेया पवार तृतीय आणि उत्तेजनार्थ म्हणून आरती रोंटे, वेदांत येमेकर,सातवी ते दहावी गटातून प्रथम त्रिविक्रम बाभळीकर, द्वितीय ईश्वरी लाकडे, शालिनी बोंबले, समीक्षा जाधव, तृतीय नरेश अटनमवार वैष्णवी भोरे या सर्वांचे शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थाध्यक्ष साईरेड्डी ठक्कूरवार संचालिका रमा ठक्कूरवार शाळेचे प्राचार्य टी. नर्सिंगराव पर्यवेक्षक राजेश कागळे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनिकर शामला तर आभार प्रदर्शन येमेकर नागनाथ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या