मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात दुगाव येथे स्वातंत्र्य सैनिक स्मृतीस्तंभ उभारणीस निधी उपलब्ध करून देण्याची मुखमंत्र्याकडे मागणी.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
दुगाव तालुका बिलोली येथील आठ स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात निजाम सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात दुगाव येथे लढा लढून सहभाग घेतला होता. त्या सर्व स्वातंत्र सैनिकांच्या स्मृती पुढील पिढीला कायम स्मरणात राहण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक शेषराव पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने स्मृतीस्तंभाची दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे उभारणी करण्यात येणार आहे.
त्यासाठी संस्थेस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री मा.ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर शासनाच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात दुगाव तालुका बिलोली येथे आठ स्वतंत्र सैनिकांनी सहभागी होऊन निझाम जुलमी राजवटी विरोधात लढा लढला. 
 त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांचा इतिहास पुढील पिढीला कायम स्मरणात राहावा यासाठी स्वातंत्र्य सैनिक शेषराव पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेऊन त्यांच्या स्मरणार्थ गावात स्मृतीस्तंभ उभारणीचा निर्णय घेण्यात आलेला आह.
त्या स्मृतीस्तंभ उभारणीसाठी मुख्यमंत्री निधीतून संस्थेस निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी संस्थेचे अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली प्रसंगी मानव विकास संस्थेचे अध्यक्ष विजय पेटकर, मिनेश रेवडकर सह आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या