मराठवाडा शिक्षक संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर ; तालुकाध्यक्ष पदी लगडे तर सचिवपदी गायकवाड यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुका मराठवाडा शिक्षक संघटनेची तालुकास्तरीय बैठक आंतर भारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यात बिलोली तालुका मराठवाडा शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सी.एम.लगडे तर सचिव पदी विजयकुमार गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे: उपाध्यक्ष विनायक इंगळे, सहसचिव माधव मोरे, शेटकर उमाकांत, कोषाध्यक्ष एस.के. शेख, तालुका संघटक बी.यु.इंगळे, एस.एन.पाचपिपळीकर, प्रसिद्धीप्रमुख हिवराळे बालाजी, डी.एस.गुरुडे, प्रवक्ता एम.जी.मठपती, मोरे बाबुराव, महिला प्रतिनिधी पवार मॅडम, एल.आर.शिंदे, दगडे मॅडम सदस्यपदी सहशिक्षक शेख, राजूरे सर, कच्छवे सर, एन. आय.खपाटे, बालाजी मदनुरे, बी.जी.भोसले, बी.जी.मुंडे आदिंची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
या नूतन कार्यकारणीचे शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या