कुंडलवाडी बाजार समिती निवडणुकीत 47 उमेदवारांची निवडणुकीतून माघार !

● आडत व व्यापारी मतदार संघातून काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध !
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून,या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र उचलण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 26 रोजी 47 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी आर कोरवाड यांनी दिली आहे. 
           कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकिसाठी काँग्रेस व भाजप प्रणित पॅनल ने आपआपल्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते,या निवडणुकीत एकूण 87 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज वैद्य होते.
दिनांक 26 रोजी नामनिर्देशन पत्र माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 26 रोजी 47 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ, सुंकलोड हजप्पा, ढगे दिगंबर, पांडागळे सिद्राम,महंमद खय्युम, ढगे बळवंत, तिरुपती हिवराळे, खेडे मारोती,कनशेट्टे हनमंत, हिवराळे रणजित, अभिजीत धरमुरे, नरवाडे व्यंकटराव, नरवाडे माधवराव, सोलगे शंकर, गोपछडे उमाकांतराव, नरवाडे सुधाकर, बोगरे गणेश, शिंदे बालाजी, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ साखरे माधुरी,धरमुरे सुलोचनाबाई, बोडके कमलाबाई, नरवाडे शोभाबाई,इतर मागासवर्गीय मतदार संघ राजुरकर लिंगुराम, फडसे जगदीश, येबडवार नीलकंठ, दिंडे संतोष, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ परसूरे लक्ष्मण, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ ओमप्रकाश बोडके, फडसे जगदीश, शिरगिरे संग्राम, रुखमाजी होरके, नरवाडे आनंदा, भाले अशोक, बोडके सदाशिव, अनुजाती जमाती ग्रामपंचायत मतदार संघ कांबळे साहेबराव, लाखे श्रावण, मेहरकर चांदराव, वाघमारे दयानंद, सोनकांबळे राजू, वाघमारे राजाबाई, ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया दुर्बल घटक मतदार संघ बोगरे गणेश, बोडके नागनाथ, आडात व व्यापारी मतदार संघ शेख मेनोद्दीन, दाचावार श्रीराम, मो. अहमद गौस, गादगे दतराम, हमाल मापाडी मतदारसंघ नरावाड गंगाधर, वाघमारे विजय आदींनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.
भाजपचे व अन्य उमेदवारांनी आडत व व्यापारी मतदार संघातून आपली उमेदवारी माघे घेतल्यामुळे काँग्रेसचे राजेश्वर उत्तरवार, रमेश दाचावार बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जी आर कोरवार यांनी काम पाहिले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या