मारोती चरकेवाड यांना विभागीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे (शिक्षक दिन) औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, वसतिगृहात उत्कृष्टरित्या काम करणा-या मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांचा शिक्षक दिनी प्रशस्तिपत्र व सन्मान चिन्ह देउन नुकताच गौरव करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन प्रादेशिक उपायुक्त, कार्यालय लातुर येथे नांदेड, लातुर, उस्मानाबाद, आणि हिंगोली जिल्हयातील उत्कृष्ट मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे साहेब यांच्या संकल्पनेतुन राज्यात प्रथमच सामाजिक न्याय विभागातील काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांचा गौरव करण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार शासकीय निवासी शाळा, हदगाव जि.नांदेड येथील सहाय्यक शिक्षक मारोती बाळुराम चरकेवाड यांना २०२२ चा विभाग स्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड चे तेजस माळवदकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातुर, शिवकांत चिकुर्ते सहाय्यक आयुक्त, बी.जी. आरावत आणि उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शिक्षक मारोती चरकेवाड याना गौरविण्यात आले.
मारोती चरकेवाड याना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्या बदल शाळेचे मुख्याध्यापक बुरकुले सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या