मारोतराव कवळे गुरुजी यांचा विविध विकास काम उद्घाटन निमित्ताने आरळी सर्कल मध्ये दौरा !

मारोतराव कवळे गुरुजी यांचा स्व.रावसाहेब अंतापूरकर यांच्या श्रद्धांजली पर आणि पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, तसेच विविध विकास काम उद्घाटन निमित्ताने आरळी सर्कल मध्ये दौरा झाला.

बिलोली तालुक्यातील आरळी सर्कल मधील कुंभारगाव येथे देगलुर बिलोली मतदार संघाचे आमदार स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन. 2020-21 अंतर्गत दिलेल्या 10 लक्ष रू च्या व 25-15 मधुन दिलेल्या 10 लक्ष रू महादेव मंदिराकङे जाणाऱ्या सिसि रोङचे व विविध विकास कामाचे भूमीपूजन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच अध्यक्षीय भाषणात कवळे गुरुजी यांनी विविध विषयांवर चर्चा केली ते म्हणाले जिल्ह्याला पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांसारखा दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला मिळाला हे जपण्यासाठी त्यांनी दिलेली माणसे विजयी झाली पाहिजे त्यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसची ताकत परिसरात निर्माण करावी असा आशावाद व्यक्त केला..तसेच परिसरातील सिंचनाची कामे करून घेण्यासाठी हक्काचा माणूस जिल्ह्यात तयार करूया असेही ते म्हणाले..

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ श्री श्रीनिवास पाटील चव्हाण, बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री केदार पा साळुंके,आरळी सर्कल चे नेते श्री हाजपा पाटिल, बिलोली पंचायत समितीचे उपसभापती श्री शंकरमामा यंकम,श्री दिलीप पा पांढरे,श्री सिदराम पांङागळे,श्री बालाजी पा सुगावे,श्री साईनाथ पा निवले ,श्री पपु पा.कोळगाव,श्री शंकरराव पा नरवाङे, श्री बंळवत पाटिल,व कुंभारगावचे सरपंच श्री सोमनाथ पांचाळ,उपसरपंच श्री माधव पा नरवाङे,कुंभारगाव गावातील सर्व गावकरी आरळी सर्कल मधील सर्व गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलिस पाटिल तंटामुक्ती अध्यक्ष व पत्रकार बांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या