सर्व विवाहित जोडप्याचे विवाह नोंदणी होणे गरजेचे आहे – कोरो एकल महिला संघटना !

[ विशेष /प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर ]
  – संपर्क ९९६०७४८६८२ / दिनांक 12 ऑक्टोबर बीड। 
पंचायत समिती सभागृह बीड येथे ग्रामविकास अधिकारी यांच्या सोबत कोरो महिला संपत्ती अधिकार मोहीम, एकल महिला संघटना व पंचायत समिती बीड च्या संयुक्त विद्यमाने विवाह नोंदणी संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी श्री ए.डी.सानप साहेब, विस्तार अधिकारी मोरे ए. एस. यांनी मार्गदर्शन केले.
तसेच के.बी. शेळके विस्तार अधिकारी बीड उपस्थित होते. रुक्मिणी नागापुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक केले. एक ग्रामपंचायत चा 100 कुटूंबाचा सर्वे करण्यात आला त्याची सद्यस्थिती सांगण्यात आली. त्यानुसार खूप कमी विवाह नोंदणी झाल्याचे दिसून आले.
तसेच विवाह नोंदणी केल्यास महिलांना सासरच्या संपत्तीत अधिकार मिळण्यास सोपे होईल , बालविवाह कमी होतील , यामुळे कमी वयात लादले जाणारे मातृत्व लादले जाणार नाही, विवाह नोंदणी केली तर आरोग्य विषयक लाभ मिळण्यास मदत होईल , नोंदणी केली तर त्यांना ईतर कागदपत्रे काढण्यास हा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी उपलब्ध होईल या विषयावर चर्चा केली.
ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत ला विवाह नोंदणी चे माहीती व लागणारे कागदपत्रे याची माहिती लावण्यात येईल. तर मोठया प्रमाणात विवाह नोंदणी करण्यासाठी जनजागृती करू तसेच बीड तालुक्यातील विवाहित जोडप्याचे नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. असे ही सांगितले. यामुळे बालविवाह रोखले जातील. विवाह नोंदणी ची ग्रामपंचायत निहाय आकडेवारी सर्व ग्रामसेवक पंचायत समितीकडे कळवतील असे ठरवले. यावेळी सर्व तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या