नांदेड जिल्ह्यातील 16 ही हुतात्मा स्मारकाचा विकास करण्याचे पालकमंत्री यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश; केदार साळुंकेच्या मागणीला यश.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नांदेड- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील 16 हुतात्मा स्मारकांचा विकास करण्याच्या मागणीला यश आलं आहे. याबाबत स्वातंत्र्यसैनिक शेषराव पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी पालकमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्या समोर स्मारकांच्या विकासा बाबत मागणी केली. पालकमंत्र्यानी साळुंके यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने जिल्ह्यातील सोळाही स्मारकांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
            स्मारकांच्या विकास करण्या बाबाद केदार साळुंके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यासोबतच पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकाला अध्याप पर्यंत रंगरंगोटी शिवाय विशेष विकास करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज 17 सप्टेंबर रोजी जिल्हा हुतात्मा स्मारक स्थळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांची भेट घेऊन हुतात्मा स्मारकांचा विकास करण्याची मागणी केली, प्रसंगी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना बोलावून तातडीने स्मारक स्थळी पेवर ब्लॉक, संरक्षण भिंतीसह वृक्ष लागवड करून सुशोभीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे केदार साळुंकेच्या मागणीला यश आल्याचे दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा वर्षभर निजामाच्या तावडीत होता, निजामाच्या तावडीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाला. या लढ्यास मराठवाडा मुक्ती संग्राम लढा म्हणून संबोधले जाते, या लढ्यातील पहिले हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांच्यासह अन्य हुतात्म्यांची शासनाने मान्यता दिलेले 16 स्मारके नांदेड जिल्ह्यात आहेत. याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठवाडा मुक्तिसाठी लढा उभारला गेला होता, तेथेही हुतात्मा झाले मात्र त्या ठिकाणी हुतात्मा स्मारकेच उभारली गेली नाहीत.मात्र उभारलेल्या जिल्ह्यातील 16 ही हुतात्मा स्मारकांची अवस्था ही अनेक ठिकाणी संरक्षण भिंत, गेट, लाईट, पाणी नाही याशिवाय या स्मारकांची पडझड झालेली आहे. या 16 ही स्मारकांची पाहणी स्वातंत्र्यसैनिक शेषराव पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी करून 17 सप्टेंबर पूर्वी तातडीने स्मारकाचा विकास करण्याची मागणी शासनाकडे व प्रशासनाकडे वेळोवेळी करत पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला धारेवर धरले होते.
मात्र अद्याप स्मारकांचे रंगरंगोटी शिवाय कुठलेही विकास कामे तेथे झालेले नाहीत. त्यामुळे आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा हुतात्मा स्मारक विसावा गार्डन येथील कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री माननीय नामदार गिरीजी महाजन यांची भेट घेऊन स्मारकांचा विकास मराठवाडा मुक्ती संग्राम वर्षानिमित्त करण्याची मागणी केली. प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मागणीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना बोलावून 16 ही स्मारकांच्या ठिकाणी पेवर ब्लॉक, संरक्षण भिंती, गेट वृक्ष लागवड, विद्युतीकरण, सुशोभीकरण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे केदार साळुंके यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसून येत आहे. यावेळी खासदार प्रताप पाटिल चिखलीकर, आमदार राम पाटिल रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, निवासी जिल्हाधिकारी महेश वदडकर यांची उपस्तिती होती.
www.massmaharashtra.com 

* Subscribe our Youtube Channel *

ताज्या बातम्या