कुंडलवाडीत सौर ऊर्जेचे पोल व बल्ब दुरुस्ती करण्याच्या कामास सुरुवात ; प्रशासन व ठेकेदारांनी घेतली “मास महाराष्ट्र” च्या बातमीची दखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगर परिषद अंतर्गत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून शहरात लावण्यात आलेले सौर ऊर्जा विद्युत पोल व बल्ब बंद अवस्थेत असल्याची बातमी “कुंडलवाडीत सौर ऊर्जेचे पोल बनले शोभेचे वस्तू ” या मथल्याखाली दिनांक 8 रोजी प्रकाशित झाली होती, सदरील बातमीची दखल प्रशासन व ठेकेदारांनी घेऊन बंद असलेले सौर ऊर्जा पोल व बल्ब दुरुस्ती करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
कुंडलवाडी शहरात गेल्या एक वर्षापूर्वी शहरातील आंबेडकर नगर, साठे नगर,नई आबादी, आदी ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून एक कोटी रुपये खर्च करून सौर ऊर्जा पोल बसवण्यात आले होते ,सदरील काम युनिक इलेक्ट्रिकल्स नांदेड या कंपनीला प्रशासनाने दिले होते.पण ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे गेल्या अनेक दिवसापासून सौर ऊर्जेचे पोल व बल्ब बंद अवस्थेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देऊन सौर ऊर्जा पोल व बल्ब दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची बातमी मास महाराष्ट्र या पोर्टल चॅनेलवर “कुंडलवाडीत सौर ऊर्जेचे पोल बनले शोभेचे वस्तू” या मथळ्याखाली दिनांक 8 रोजी प्रकाशित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन व ठेकेदार खडबडून जागे होऊन बंद पडलेले सौर ऊर्जेचे पोल व बल्ब दुरुस्ती करण्याचे काम चालू करण्यात आले आहे. असे असले तरी संबंधित कामाचे देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी किमान पाच वर्ष ठेकेदारावर असणार आहे त्यामुळे सदरील काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत..
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या