मातोश्री प्रतिष्ठाण नांदेड च्या वतीने मारोतराव कवळे गुरुजी यांना कृषिरत्न पुरस्कार !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांना मातोश्री प्रतिष्ठाण नांदेड च्या वतीने 2023 चा कृषिरत्न पुरस्कार कुसुम सभागृह नांदेड येथे देण्यात आला.
निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे नायगाव विधान मतदार सभा मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांना मातोश्री प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने कृषिरत्न पुरस्कार नांदेड येथील कुसुम सभागृहात जिल्हाधिकारी व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित यावेळी उद्घाटक म्हणून नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
मातोश्री प्रतिष्ठाण चे विश्वस्त कामाजीराव पवार,सौ.जयश्रीताई पवार,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू उद्धवजी भोसले, प्रमुख वक्ते गणेश शिंदे, कैलासजी दाड, बाळासाहेब शेंबोलीकर, अरविंद पाटील सर, दीपक कदम सर, आदिजन उपस्थित होते बदल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या