मराठा सेवा संघ तालुका शाखा नायगाव च्या वतीने वधू वर परिचय मेळावा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 मराठा सेवा संघ ता शाखा नायगांव च्या वतीने मराठा वधू वर परिचय मेळावा दिनांक 22 जानेवारी रोजी रविवारी साईतीर्थ मंगल कार्यालय नायगांव येथे आयोजित करण्यात आला असून मेळाव्याची जय्यत चालू आहे मराठा सेवा संघाच्या वतीने नायगाव येथे वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सर्वसामान्य समाजातील व्यक्तींना वधू वर पालकांना परिचयासाठी घरोघरी फिरावे लागत असून त्यामध्ये वेळ पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तो खर्च वाया जाऊ नये म्हणून समाज बांधवांना दिलासा मीळावा म्हणून समाजातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन चांगल्या प्रकारे वधू वर परिचय मेळावा साजरा केला जावा म्हणून यावर्षी वधू वर परिचय मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी या वधू वर परिचय मेळाव्यामध्ये समाज बांधवांनी व वधू-वरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता.
त्याप्रमाणे याही वर्षी समाज बांधवांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून येत आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हितचिंतकांना, या संदर्भातली माहिती देऊन जास्तीत जास्त वधू-वरांची नांव नोंदणी करून एकाच ठिकाणी सर्वांचा परिचय होण्याच्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पवळे तसेच संतोष पाटील कल्याण सचिव जाधव डी टी कार्याध्यक्ष नारायण पाटील शिंदे कोषाध्यक्ष त्याचबरोबर तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या