सर्वांच्या सहकार्याने बौद्ध समाज स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू शकलो -नगराध्यक्ष शिरशेटवार

( देगलूर  ) –

कुठलाही प्रश्न सोडविण्यासाठी मनातून प्रामाणिक इच्छा असली की तो सुटू शकतो हे ठरवूनच मी सगळ्यांच्या सहकार्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावू शकलो असे मत नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी मांडले. ते येथील बौद्ध समाज स्मशानभुमी बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

या स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करताना समाजबांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याची मला अगोदरपासूनच जाणीव होती. हा प्रश्न आपण सोडविला पाहिजे असे ठाम ठरविले होते. सर्वांच्या सहकार्याने मी नगराध्यक्ष झालो आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवात केली. मुळात ती स्मशानभूमी नावावर नसल्याने अगोदर ती बौद्ध समाज स्मशानभूमी नावावर सातबारावर करून घेतली. आणि याच्या विकासासाठी एक कोटी 80 लाख रुपयांचा निधी दलित वस्ती योजनेतून मंजूर करून घेतला. आज या अध्यावत व सर्व सोयीयुक्त स्मशानभुमी बांधकामाचे भूमिपूजन होत आहे, याचा मला मनस्वी अभिमान असून मी बौद्ध समाजाला न्याय मिळवून दिल्याचे समाधान मिळत असल्याचे मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले.

मातंग समाज स्मशानभूमी देखील सातबारावर घेतली असून येत्या दोन-तीन महिन्यात त्याचे सुद्धा बांधकाम करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी जी. एम. ईरलोड, नगरसेवक बालाजीराव रोयलावार,अविनाश निलमवार, सुशीलकुमार देगलूरकर, शेख महंमद, मुक्ती साब, सय्यद निसार, निसार देशमुख ,एड. अंकुष देसाई, मनोज तोटावार, अशोक गंदपवार, प्रशांत दासरवार, धोंडीबा वानखेडे, तुळशीराम संगमवार, शैलेश उल्लेवार, बालराज मालेगावकर, नरेश अडीशेरलावार, वाय. जी. सोनकांबळे ,धोंडीबा कांबळे( मिस्त्री), यादवराव पिंगळे, शत्रुघन वाघमारे, सूर्यकांत सोनकांबळे, राजा कांबळे, मिलिंद बिरकंगन, मारुती शेरे, शरद सोमे,युवा पँथर तालुकाध्यक्ष विकास नरबागे, राजू गायकवाड, रॉनी दूगाणे, राहुल बिरकंगन, धम्मपाल कांबळे, स्वप्नील देगलूरकर ,सचिन कांबळे, गजू कांबळे,अभियंता अशोक पाटील, मुन्ना पवाडे, भूषण अटकळीकर, अजय वानखेडे, सावंत टी .आर., राजू वानखेडे, गंगाधर डोंगळीकर, ज्ञानेश्वर सावंत, नागोराव वानखेडे, डॉ. प्रा. भीमराव माळगे, हनुमंत ढवळे, व्यंकटराव बोरगावकर, वाय .सी. भुताळे, मारोतीराव आळंदीकर, प्रभाकर कांबळे, पवन सावंत,गुत्तेदार देविदास वानखेडे, आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या