26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधानाचे महत्त्व सांगत वनभोजनाचा आनंद घेतला !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील देगाव येथील सुभाष पा मोरे यांच्या शेतात गजानन चौधरी यांच्या पुढाकाराने व बालू सावकार बावुलगावकर यांच्या सहकार्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संविधानाचे महत्त्व पटवून देत गप्पागोष्टी करत लुटला निसर्गाच्या सान्निध्यात व हिरवळीवर काळ्या आईच्या कुशीत गावरान मेवा असलेल्या हुळापार्टीचा आस्वाद घेत वनभोजनाचा आनंदा लुटत शिवमनगर मित्रमंडळी च्या सर्व मित्रांनी यथेच्छ अनुभवला.

या प्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपले अनुभव कथन केले. यात श्री जाधव व्ही सी, अशोक पवळे, शिंदे जी एम, जाधव डी टी, शिंदे बी डी, यांनी 1950 ते 2023 या कालावधीमध्ये संविधानाने मिळालेली हक्क व कर्तव्य यावर चर्चा केली योगायोगाने या दिवशी शिंदे भास्कर पा यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मित्रमंडळी च्या वतीने शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

यावेळी संजय पांढरे यांनी आधुनिकत शेती कशी करावी या बाबत उपदेशन केले. या प्रसंगी बालाजी नरवाडे, नोरलावार, शिंदे टेलर, सकनूरे सर, कवटिकवार सर, रुईकर सावकार या सर्वानी आपापल्या व्यवसायातील अनुभव सांगितले तर संभाजी पाटील कदम यांनी कायदा व सुव्यवस्था या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या