म्हसळा पोलीस चे नूतन पोलीस निरीक्षक सुर्वे साहेब यांची सदिच्छा भेट !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)
 महाराष्ट्र अ॑.नि.स.‌ शाखा म्हसळा यांचे वतीने म्हसळा पोलिस स्टेशन चे नूतन पोलिस निरीक्षक उद्धव‌ सुर्वे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
यावेळी महा अ.नि.स . कार्याबाबत माहिती दिली. तसेच म्हसळा शाखेचे कार्यक्रम, उपक्रम याबाबत माहिती दिली, तसेच कोरोना कालावधीत केलेली. कामाची माहिती दिली व पुढील काळात सुद्धा प्रशासना सोबत कोरोना जनजागृती बाबत सहकार्य करण्याची हमी दिली .
या वेळी शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी म्हसळा शाखा अध्यक्ष श्री.नवाज नजीर साहेब , कार्याध्यक्ष श्री जयसिंग बेटकर सर, महिला विभाग कार्यवाह    कु.रुतिका काकडे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह श्री सुर्यवंशी सर, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह गायकवाड सर आणी जिल्हा पदाधिकारी प्रा.सोनवणे सर उपस्थित होते .
यावेळी श्री उद्धव सुर्वे साहेब यांनी महाराष्ट्र अ.नि.स च्या कार्याचे कौतुक केले व सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचा शब्द दिला .

ताज्या बातम्या