राज्यस्तरीय प्रेरक संघटनेची नांदेड येथे बैठकीचे आयोजन.
[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय साक्षरता अभियान योजनेची अंमलबजावणी माहे जानेवारी २०१२ पासून सुरुवात झाली आहे.या अभियानांतर्गत प्रत्येक गाव वाडी तांड्यावरील शाळेवर दरमहा दोन हजार रुपये मासिक मानधनवर काम करणारे सुशिक्षित बेरोजगार पदवीधर यांना शिकविण्याचे काम मिळाले होते.ते काम पवित्र अशा शिक्षणाचेअसून आपल्या हातून ज्ञानारजनाचे काम होतआहे.या उदात हेतूने अतिशय तळमळीने,कष्टाने मेहनतीने शिकविण्याचे काम सुरू केले होते.परंतु राज्य व केंद्र शासनाने हे मानधन वेळेवर नदिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कष्टाचा व घामाचा दाम वेळेवर मिळाला तरच पुढील काम करण्यास ऊर्जा मिळते या अशाने, त्यांनी नित्यनेमाने शिकविण्याचे काम करीत आहेत. परंतु शासनाने या प्रेरक प्रेरिकांना अद्याप पर्यंत मानधन नदिल्याने त्यांचे अख्खे कुटुंब उघड्यावर आलेआहे.
यामुळे त्यांना नाहक त्रास होत आहे. या शासनाच्या धोरणाविषयी व प्रेरक प्रेरकांच्या काही मागण्या घेऊन शिक्षण विभाग मंत्रालय मुंबईकडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करण्यासाठी आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम तयार करून राज्यस्तरीय प्रेरक प्रेरकांच्या संघटने मार्फत सांगपाग विचार मंथन करण्यासाठी एका राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजन नांदेड येथे दिनांक – १८/०९/२०२२ रोज रविवार शासकीय विश्रामगृह मध्ये दुपारी 12 : 00 वाजता वाजता सुरू होणार आहे. या राज्यस्तरीय बैठकीला राज्यभरातून आणि जिल्हातून प्रत्येक तालुक्यातून शेकडो प्रेरक, प्रेरिका बांधव उपस्थित राहून आपल्या अडी अडचणी, पुढील येणाऱ्या समस्या या मांडण्यासाठी बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे आहे.
यासाठी तमाम प्रेरक प्रेरिकांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान प्रेरक प्रेरिका संघटना नायगांव तालुका येथील प्रेरक दिपक गजभारे घुंगराळेकर , यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे !
www.massmaharashtra.com