राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्ताने गावोगावी बैठका चालू.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
संवेदनशील राष्ट्रीय युवा नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंत ऐतिहासिक “भारत जोडो” यात्रेच्या पार्श्वभूमी वर आज नायगाव तालुक्यातील प्रतेक गावात बैठका झाल्या.
गावातील रहिवाशांना राहुलजींच्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत बहूसंखेने सहभागी होण्यासाठी आज मौजे भोपाळा, धुप्पा, टाकळी (बु.),शेळगाव (गौरी) व कुंचोली या गावात गावक-यांसी अवाहन करताना नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, मा.उपसभापती संजय पाटील शेळगावकर, माधवराव कंधारे, गंगाधर पाटील धुप्पेकर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या