मुंबईतील विस्थापित गिरणी कामगारांसाठीच्या जनजागृती करीता बैठक !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
आज कातळपाडा येथे सेंच्युरी मिल कामगार एकता मंच च्या वतीने मुंबईतील विस्थापित गिरणी कामगारांसाठीच्या जनजागृती करीता बैठक घेण्यात आली. पोयनाड-कुर्डूस विभागातील गिरणी कामगार यावेळी उपस्थित होते.
विस्थापित गिरणी कामगार मुंबईतुन बेदखल झालाच पण त्यामुळे त्यांच्या मुलांवर आलेली बेरोजगारीची वेळ हि केवळ स्थानिक स्वार्थी राजकिय नेत्यांमुळे व मॅनेज झालेल्या कामगार नेत्यांमुळे घडलं असल्याचे मत यावेळी देवव्रत विष्णू पाटील यांनी बैठकीत व्यक्त केलं. यावेळी एकता मंचाचे अध्यक्ष श्री नंदु पारकर साहेब आणि सेक्रेटरी श्री हेमंत गोसावी यांनी उपस्थित कामगार व त्याच्या वारसांना मार्गदर्शन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या