शंकरनगर येथे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
२८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात काँग्रेस पक्षाची भव्य सभा व रॅली आयोजित करण्यात आली आहे,या निमीत्ताने बिलोली व कुंडलवाडी येथील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद दाखवण्यासाठी तालुक्यातून ७०० कार्यकर्ते जाणार असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषणातून भास्करराव पाटील खतगावकर व्यक्त केला.

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मीनल पाटील खतगावकर, बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पाटील खतगावकर, गंगाधरराव भिंगे, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, माजी जि.प.सदस्य गणेश पाटील शिंपाळकर, आनंदराव गुरुजी बिराजदार, बाबाराव भाले-सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी, हणमंतराव पाटील बामनीकर, साईनाथ पाटील निव्हळे- उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी, गंगाधरराव सोनकांबळे, दत्ता पाटील पांढरे,दिलीप पांढरे, शंकरराव यंकम, श्रीनिवास शिंदे – तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, धीरजसिंह चौहान-तालुकाध्यक्ष NSUI, फाजल बेग, अभीजित वाघमारे, अशोक कदम, सौ.आशाताई महाजन, मारोतराव नाईक, संतोष पाटील पुयड यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या