मानवहीत लोकशाही पक्षाचे कार्याध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते डॉ माणिक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हा मानवहीत ची आढावा बैठक संपन्न : अनेक पद निवडी जाहीर !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
मानवहीत लोकशाही पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष मा.विनोद भाऊ गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्हा “मानवहीत” ची आज बैठक संपन्न झाली. मानवहीत लोकशाही पक्षाचे संघटन उभ्या महाराष्ट्रात वाढवण्यासाठी प्रत्येक सैनिकांनी लढायच यासाठी कंबर कसली. यावेळी राज्य प्रवक्ते डॉ.कांबळे साहेब म्हणाले, ” प्रत्येक गावागावात मानवहीत लोकशाही पक्षाची शाखा स्थापन करून ,इथल्या देशाची राज्यकर्ती जमात बनून मोठी शक्ती तयार करा.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये जोरदार धडक द्या” असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
परभणी जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ गायकवाड म्हणाले ” यावेळची निवडणुकीत मानवहिताचां झेंडा फडकावल्याशिवाय गप्प बसणार नाही ,येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मानवहित लोकशाही पक्षाचे प्रतिनिधी सभागृहात नेतृत्व करतील ,जिल्हा परिषद पंचायत समितीत सुद्धा मानवहीत जोरदार धडक मारेल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी परभणी जिल्हा युवक अध्यक्ष मा.प्रकाश भाऊ लालझरे साहेब, नांदेड जिल्हा सोशल मिडिया चे किरण भाऊ दाढेल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या पद निवडी जाहीर झाल्या त्या पुढील प्रमाणे…
1) मिलिंद भाऊ वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष परभणी)
2) बालाजी क्षीरसागर (तालुका अध्यक्ष परभणी)
3) सचिन साठे (तालुका संघटक परभणी)
4) राजकुमार गायकवाड (सर्कल प्रमुख परभणी)
5) सचिन शिंदे(तालुका युवा तालुकाध्यक्ष परभणी)
6) प्रवीण गायकवाड (शहराध्यक्ष परभणी)
7) सचिन क्षीरसागर (शहर उपाध्यक्ष)
8) पंजाब सिंग जुनी (शहर संघटक)
9) राणा सिंग टाक (शहर उपसंघटक)
१०) राजू कांबळे (गंगाखेड तालुका अध्यक्ष)
11) संजय भाऊ अंबोरे (पूर्णा तालुका संपर्क प्रमुख)
 या सर्वांना मानवहीत लोकशाही पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन पदभार देण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या