मेळगावच्या सरपंचपदी भारतबाई महिपाळे यांची बिनविरोध निवड

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील मेळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. भारतबाई अशोक महिपाळे यांची शुक्रवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील वसतमे हे होते. 
     नायगाव तालुक्यातील मेळगाव ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया (ता.१५) मार्च रोजी शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोराव धसाडे, गोदावरी मारोती शिंदे, सविता शंकर कर्णापल्ले, माधव बालाजी शिंदे, गंगाधर थारोबा कंदरवाड यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी सुनील वसमते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सरपंचपदासाठी सौ. भारतबाई अशोक महिपाळे यांचाच एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वसमते यांनी सौ.भारतबाई यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. 
सदरची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी मोहन पाटील शिंदे, साहेबराव धसाडे, आनंदराव शिंदे, दत्ता पाटील शिंदे, बळवंत शिंदे, बालाजी शिंदे बोळसकर अदिंनी प्रयत्न केले.
या निवडीच्या वेळी सहायक म्हणून ग्रामसेवक बोंडले सुर्यकांत, मंडळ अधिकारी आर. के. पवार, तलाठी हाके, पोहेकाँ निकम यांच्यासह सेवक संजय कंदरवाड, अशोकराव महिपाळे, मारोती शिंदे, शाम गोविंदराव शिंदे, शंकर कुरनापल्ले अनेकांची उपस्थिती होती. निवडीनंतर सरपंच सौ.भारतबाई यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या