मुखेड तालुक्यातील (जि. नांदेड) श्री. क्षेत्र सद्गुरू प. पु. नराशाम महाराज मठ संस्थान, येवती हे लघु आळंदी नावाने सर्वदूर परिचित आहे. वैष्णवपंथीय अशा या देवस्थानाचा खूप मोठा भक्त वर्ग नांदेड जिल्हा, महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतील असून या देवस्थानास धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अत्यंत मोठ्या प्रमाणावर भक्त वर्ग व धार्मिक उत्सवाची भव्यता लक्षात घेता ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त देवस्थानाची दर्जोन्नती होणे आवश्यक असल्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे 2018 मध्ये यासंदर्भात विनंती प्रस्तावाद्वारे आमदार राजेश संभाजीराव पवार व सौ.पुनम ताई राजेश पवार यांनी मागणी केली होती.
सदरील पाठपुराव्यास आता यश मिळाले असून तिर्थक्षेत्र दर्जा ‘क’ मध्ये समाविष्ट असलेल्या या देवस्थानास ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. या दर्जोन्नतीमुळे माझ्यासह भाविक भक्तांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. निश्चितच यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळून विकासाच्या दिशेने देवस्थानची वाटचाल होणार असून यासाठी मी पुढील काळातही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पवित्र अशा देवस्थानाबाबतीतत अनेक आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात जाग्या आहेत.
बालपणीच्या काळात आई व आज्जीसोबत अनेक वेळा देवस्थानामध्ये मुक्कामी राहण्याचा योग ही आला. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी गुरुवर्यांनी जगन्नाथपुरी ओडिसा येथे आयोजिलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने त्यांच्या सत्संगाचा लाभ व आशीर्वादही मला घेता आला. प. पु. श्री. नराशाम महाराज मठ संस्थान, येवती यांचे आशिर्वाद माझ्यावर व माझ्या परिवारवर असेच ओथंबून कायम रहावेत, हीच प्रार्थना आमदार राजेश पवार यांनी केली.
. प. पु. श्री. नराशाम महाराज मठ संस्थान, येवती देवस्थानास तिर्थक्षेत्र ‘ब’ दर्जोन्नती दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पर्यटन मंत्री मा. ना. गिरीश महाजन साहेब तसेच तत्कालीन मा. जिल्हाधिकारी नांदेड , तत्कालीन मा. नांदेड पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलिस प्रशासन आणि या पवित्र कामास सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणेचे समस्त भाविकांच्या वतीने आभार आमदार राजेश पवार यांनी मानले आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy