मौजे कोल्हेबोरगाव येथे खा.अजित गोपछडे यांचा नागरी सत्कार ; पक्षानी एका कार्यकर्त्याचा केलेला सन्मान आहे- खा.प्रतापराव चिखलिकर.

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
नांदेड जिल्ह्यातील मौजे कोल्हेबोरगाव येथे एका सामान्य कुटूंबात जन्माला आलेल्या डाॕ.अजित माधवराव गोपछडे यांची राज्य सभेवर बिन विरोध खासदार पदी निवड करण्यात आल्याबद्दल गोपछडे यांची जन्मभुमी कोल्हेबोरगाव येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी खा.अजित गोपछडे यांचा नागरी सत्कार व सन्मान सर्व गावकरी, भाजपा कार्यकर्ते व मिञमंडळाच्या वतीने करण्यात आला.

 डाॕ.अजित गोपछडे यांनी गत ४० वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी एक निष्ठ पने राहून सतत काम करत राहिलो म्हणून भाजपाचे वरीष्ठ नेतेगनांनी त्यांची दखल घेऊन डाॕ.अजित गोपछडे यांची बिन विरुध्द राज्यसभेवर निवड करुन खासदार पदी निवड झाली. म्हणून सर्व प्रथम दैवत धर्म गुरु व मानलेले गुरुचे दर्शन घेऊन आपल्या गावी जंगी नागरी सत्कार व सन्मान सोहळा कार्यक्रमात डाॕ.अजित गोपछडे यांच्या राजकीय, वैज्ञानिक जिवन प्रवासाचे वर्णन डाॕ.अजित गोपछडे यांनी स्वतः व खा.प्रतापराव चिखलीकर यांनी भाषणातून सांगितले. तद्नंतर या निमित्ताने सर्व गावकरी व आलले सर्व प्रमुख पाहूणे, मिञमंडळानी स्वादिष्ठ जेवनाचा आस्वाद घेतला.

या नागरी सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रा.मा.रमेशराव पांडव, जि.अ.डाॕ.संतुकराव हांबर्डे, गोविंदराव केंद्र,तुषार राठोड, आ.राम पाटील गंगाधर जोशी, आ.राजेश पवार, पूनम ताई, माजी.आ.गंगाधर पटने, चैतन्य बापू देशमुख, माजी आ.सुभाष साबणे, मधुजी गिरगावकर, इंद्रजित तुडमे, श्रीनिवास नरवाडे, सुनिल एबडवार, यांच्या सह ग्रामस्त नागरिक उपस्थित होते.तर हावगीर राव गोपछडे, बाळगोपाळ चौधरी यांनी सुञसंचलन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या