प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या विजयाचा बिलोलीत जल्लोष !

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
नांदेड लोकसभेचे कांग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कै.वसंतराव चव्हाणांच्या अकाली निधनानंतर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणूकीत खा.कै.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव  प्रा.रविद्र वसंतराव चव्हाण यांनी कांग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली. भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्यासोबत अटितटीची लढत झाली.

निवडणूकीची मतमोजणी  दि.२३ नोव्हेंबर रोजी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कांग्रेसचे प्रा.रविद्र वसंतराव चव्हाण हे भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्यापेक्षा १४५७ इतकी जास्त मते घेऊन विजयी झाले आहेत असे घोषित केले.

राज्यात देगलूर -बिलोली विधानसभा व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन कोरोनामुळे झाले होते. म्हणून त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती व ते निवडून आले होते.
त्याचप्रमाणे कै.खा.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र चव्हाण यांना कांग्रेसने पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यामुळे मतदारांत सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि कै.वसंतराव चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्याची पोच पावती म्हणून मतदारांनी मतदानातून कौल दिला आणि प्रा.रविंद्र चव्हाण यांना अटीतटीच्या लढतीत खासदार म्हणून निवडून दिले.
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रारंभापासून ते अखेरपर्यंत चुरशीची झाली होती पण अखेर सांय १० वाजता महायुती भाजपाचे डॉ.संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मते तर कांग्रेसचे प्रा.रविद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते मिळाली असता प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या मतांची फेर मोजणी केल्या नंतर १ हजार ४५७ मतांची लीड दिसून आली. यामुळे प्रा.रविंद्र चव्हाण हेच विजयी झाले आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
खा.प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या या विजयाचे श्रेय लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग यांना जाते. या विजयाने नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बिलोली शहरात कार्यकर्त्यांच्या वतीने डीजे लावून आनंद साजरा करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या