कुंडलवाडीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथील नगर परिषदेच्या अंतर्गत आजादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘ मेरी माटी मेरा देश ‘ या उपक्रमांतर्गत शहरातील दलित वस्ती शमशान भूमी, साईनाथ उत्तरवार प्लॉट, कचरा डम्पिंग ग्राउंड, साठे नगर, आदि ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

             शासनाच्या वतीने आजादीच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या अनुषंगाने शहरातील विविध शाळा, शासकीय कार्यालय, नगर परिषद आदी ठिकाणी सकाळी पंचप्रणतेची शपथ घेण्यात आली, तर नगर परिषदेच्या वतीने शहरातील दलित समशान भूमी, साईनाथ उत्तरवार यांचे प्लॉट, कचरा डम्पिंग ग्राउंड, साठे नगर आदी ठिकाणी 100 च्या वर देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

              यावेळी माजी उपनगराध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, माजी नगरसेवक शंकर गोणेलवार, सामाजिक कार्यकर्ते महंमद अफजल, संकेत उत्तरवार, प्रभारी मुख्याधिकारी रघुनाथसिह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार, गंगाधर पत्की, हेमचंद्र वाघमारे, वीरसेन शिरसाट, मुंजाजी रेनगडे, वनकर शहाणे, प्रकाश भोरे, मारोती करपे, जनार्धन भोरे, मोहन कंपाळे, धोंडीबा वाघमारे, भरत काळे, रामदास र रामदिनवार, रोहित हातोडे, दिलीप वाघमारे, साहेबराव वाघमारे, विजय वाघमारे, आदी कर्मचारी उपस्थित होते..

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या