म्हसळा तालुक्यातून उत्कृष्ट BLO म्हणून श्री अब्बास शेख यांची निवड!

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
25 जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, रायगड यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून उत्कृष्ट BLO चा सत्कार करण्यात आला.

यामध्ये म्हसळा तालुक्यातून उत्कृष्ट BLO म्हणून श्री.अब्बास शेख यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा कार्यक्रम रायगड चे जिल्हाधिकारी श्री.महेंद्र कल्याणकर,अप्पर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव व चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किरण पाटील, पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, निवासी जिल्हाधिकारी मा.पद्मश्री बैनाडे मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

      श्री.अब्बास शेख हे रायगड जिल्हा परिषद शाळा मेंदडी येथे कार्यरत असून निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणारे मतदार नोंदणीसाठी गावात फिरून लोकप्रतिनिधी यांना भेटून गावांमध्ये जनजागृती करून नवीन नाव नोंदणी, नाव कमी करणे, स्थलांतर, ओळखपत्र वाटप ही कामे सामाजिक बांधिलकी समजून करत असतात व अहवाल वरिष्ठांकडे वेळेवर पाठवत असतात.
याचीच दखल घेऊन म्हसळा तहसील कार्यालयाच्या शिफारशीने जिल्हा स्तरावरील कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. याबद्दल तहसीलदार समीर घारे, नायब तहसीलदार श्री. भिंगारे, पाटील, तलाठी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.किशोर मोहिते सर्व शिक्षकवर्ग, विविध शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या