म्हसळा टाईम्स परिवाराच्या वतीने आदर्श शिक्षक श्री.किशोर मोहिते सर यांचा सन्मान !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेने म्हसळा तालुक्यातील श्री किशोर मोहिते यांना शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
श्री किशोर मोहिते सर हे रा. जि. प. शाळा मेंदडी मराठी येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांनी 15 जून 1995 रोजी सेवेची सुरुवात कांदळवाडा येथून केली.यानंतर ढोरजे, गटसाधन केंद्र येथे काम केले. सध्या पदवीधर शिक्षकाबरोबरच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
       सेवेच्या 26 वर्षाचे कालावधीत शिक्षकांच्या सहकार्याने वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले.शाळाबाह्य व दिव्यांग मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणून टिकवून ठेवणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
         कोवीड, निसर्ग चक्रीवादळ या काळात मा गटविकास अधिकारी, मा गटशिक्षणाधिकारी यांचे आदेशानुसार गावागावांत ग्रामस्थांच्या भेटी घेवून उद्बोधन केले. शिक्षक, विविध संस्थांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, रक्तदान शिबिर आयोजन केले.
अमृत महोत्सव निमित्त शाळा व केंद्रात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांचे सहकार्याने विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
        या सर्व बाबींचा विचार करून 2022 चा रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला याबद्दल शिक्षक संघटना पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक, मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
याच अनुषंगाने म्हसळा टाईम्सचे संस्थापक मा. श्री रमेशजी पोटले म्हसळा टाईम्सचे परिवाराचे अध्यक्ष मा श्री रामचंद्र म्हात्रे ( रायगड भूषण ), उपाध्यक्ष मा. श्री प्रा. महंमद शेख सर, आदर्श सरपंच मा. निलेश मांदाडकर मा. श्री सूर्यकांत तांबे, पत्रकार संतोष उत्तरकर, श्री प्रफुल पाटील सर मा. जोशी, श्री दत्ताजी सुतार इ. मान्यवरांच्या उपस्थितीत मा. श्री किशोर मोहिते सर या सत्कार मूर्तींचा म्हसळा टाईम्स परिवाराच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने श्री माऊलीची तसबीर व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी मान्यवरांनी सत्कारमूर्तीच्या कार्याबद्दल भरभरून कौतूक केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या