बहुजन क्रांती मोर्चा कडून म्हसळा तहसिलदार यांस निवेदन देवून नागरिकांच्या समस्या मांडल्या.

म्हसळा/रायगड तालूका प्रतिनिधी – अंगद कांबळे 

सविस्तर वृत्त असे की,म्हसळा शहरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी माणगांव,गोरेगाव कडून येणारी वाहतूक म्हसळा बायपासने वळवण्याचा निर्णय दि.१५/१२/२०२० पासून अंमलात आणला गेला.सर्व खाजगी वाहने बायपासने वळवून वाहतूक कोंडी कमी केल्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गांचे बहुजन क्रांती मोर्चाकडून स्वागत करण्यात आले.परंतु शहरात ज्या बाहेरून येणारी बस व त्यामधील प्रवाशी म्हसळा बायपास पेट्रोल पंपाजवळ उतरवल्यामुळे शहरात जाणार्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.देवघर किंवा जवळून जे गाव आहेत.त्या प्रवाशांचे एसटी प्रवासभाडे १० रू.मध्ये म्हसळा आहे.परंतु बायपास पेट्रोल पंपापासून शहरात जाण्यासाठी रिक्षाभाडा ५० रू. खर्च येत आहे.अगोदर कोरोना,निसर्ग चक्रिवादळामुळे सर्व जनतेची आर्थिक अडचण आणि यात हि भर हि आर्थिक कोंडी थांबविण्यासाठी बायपासने वाहतूक करण्याचा निर्णय रद्द करावा.तसेच माणगांव,गोरेगावहून येणार्या बसला म्हसळा शहरातून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी.अशी मागणीचे पत्र संयोजक बहुजन क्रांती मोर्चा रायगड यांच्या कडून करण्यात आली.

ताज्या बातम्या