म्हसळा शहरातील घरपट्टी पाणीपट्टी माफ करा ; बहुजन क्रांती मोर्चा ची मागणी !

(रायगड /म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)

खासदार सुनीलजी तटकरेना दिले निवेदन…

“सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उद्योग धंदे व’ लहान सहान व्यावसायिकांच्या व्यापारास खिळ बसली आहे.अशातच भर म्हणून ३ जूनच्या निर्सग चक्रीवादळ ने म्हसळा,श्रीवर्धन शहराला झोडपून काढले होते.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मार्च २०२० पासून संपूर्ण! देशात कोविड-१९ (कोरोना) महामारीने थैमान घातले आहे.

त्यामुळे लॉकडाऊनमुळे सर्वच स्तरातील नागरिकांचे जनजीवन मोठया प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. त्यातच आणखी भर म्हणून ३ जूनच्या चक्रीवादळ ने म्हसळा आणि श्रीवर्धन शहरात थैमान घातले होते
लॉक डाऊन मध्ये सर्वांचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत.

त्यामुळे म्हसळा शहरातील नागरिकांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. लोकांच्या हाताला काम नाही, छोटे उद्योग-व्यवसाय करणारे लोकांचे व्यवसाय पूर्णपणे बंदच आहेत.अशी परिस्थिती आणखी किती काळ चालेल याबद्दल काही सांगता येत नाही.

नागरिकांची आर्थिक स्थिती पाहता म्हसळा शहरातील नागरिकांची सन २०१९-२०सालची घरपट्टी.

पाणीपट्टी माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही याद्वारे करीत आहोत. यावेळी श्री महेश जाधव,श्री संदीप गायकवाड बहुजन क्रांती मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते ..

ताज्या बातम्या